हिंगोलीतील युवकांना उद्योजकतेची संधी- अमृततर्फे EDP प्रशिक्षण नोंदणी

अमृत हिंगोली कार्यालयात लवकरच EDP प्रशिक्षण होणार आहे. बॅचसाठी नोंदणी करण्याचे आवाहन

हिंगोलीतील युवकांना उद्योजकतेची संधी- अमृततर्फे EDP प्रशिक्षण नोंदणी मुख्य फोटो
मुख्य फोटो

धाराशिव: महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या उद्योजकता विकास कार्यक्रम (EDP) प्रशिक्षणासाठी धाराशिव जिल्ह्यातील इच्छुक युवक-युवती व लाभार्थ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


EDP प्रशिक्षणाच्या माध्यमातून सहभागी प्रशिक्षणार्थींना व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक असलेले उद्योजकता कौशल्य, व्यवसाय नियोजन, आर्थिक व्यवस्थापन, बाजारपेठेची माहिती, डिजिटल साधनांचा वापर तसेच उद्योग क्षेत्रातील विविध संधींबाबत तज्ज्ञ मार्गदर्शन देण्यात येणार आहे.


स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असलेल्या, नवीन उद्योग उभारण्याचा विचार करणाऱ्या तसेच विद्यमान व्यवसायाला अधिक सक्षम करण्यासाठी इच्छुक असलेल्या लाभार्थ्यांसाठी हे प्रशिक्षण उपयुक्त ठरणार आहे. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर व्यवसायाच्या संधी, आवश्यक नियोजन व पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे.


धाराशिव जिल्ह्यातील जास्तीत जास्त इच्छुकांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेऊन रोजगार शोधणारे नव्हे तर रोजगार निर्माण करणारे उद्योजक बनण्याच्या दिशेने पुढे यावे, असे आवाहन अमृत जिल्हा कार्यालय, धाराशिव यांच्यावतीने करण्यात आले आहे.


संपर्क :

अमृत जिल्हा कार्यालय, धाराशिव

ऋणानुबंध, तळमजला, वृंदावन कॉलनी, धाराशिव – ४१३५०१

संपर्क क्रमांक : ७३९१०६५४६९ अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा २५ जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

Publisher: Chinmay Kulkarni News publisher name | Date: 25-06-2026 News publication date | Time: 05:30 PM News publication time | Views: 47 Number of times this news has been viewed | District: Dharashiv Related district of the news
Publisher: Chinmay Kulkarni News publisher name | Date: 25-06-2026 News publication date | Time: 05:30 PM News publication time | Views: 47 Number of times this news has been viewed | District: Dharashiv Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement