अमृत कार्यालय, नांदेडकडून महाराष्ट्रातील 'प्रथम अमृत संवाद सेतू' उपक्रम राबविला जाणार आहे.
अमृत, नांदेड.
अमृत संस्थेमार्फतनिरंतर सामाजिक उपक्रम राबवले जातात. यातच शालेय विद्यार्थ्यांना प्रशासकीय कार्यालयीन कामकाजाची माहिती व्हावी आणि तरुण पिढी आत्मनिर्भर व्हावी या हेतूने, अमृत कार्यालय, नांदेडतर्फे महाराष्ट्रातील 'प्रथम अमृत संवाद सेतू' उपक्रम उद्या दिनांक २५/०६/२०२६ रोजी राबविण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत नांदेड जिल्ह्यातील शासकीय औ.प्र.सं. नायगाव येथील विद्यार्थ्यांना तहसील कार्यालय, नायगाव येथे घेऊन जाऊन त्यांना तहसील कार्यालयीन कामकाजाची माहिती दिली जाणार आहे.
नांदेडचे उपव्यवस्थापक श्री. विश्वेश्वर जोशी यांनी मा. तहसीलदार मॅडम व औ.प्र.सं. नायगावचे प्राध्यापक श्री. अन्नपूर्णे सर यांना भेटून उद्याच्या उपक्रमाबद्दल सविस्तर माहिती सांगून अमृततर्फे निवेदन दिले आहे. अमृत संस्थेतर्फे हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविला जाणार आहे. शासकीय कार्यालये, त्यांची रचना आणि त्यांचे कामकाज यांची सामान्य नागरिकांना, विशेषतः विद्यार्थ्यांना ओळख व्हावी, त्यांचे या व्यवस्थेविषयीचे गैरसमज दूर व्हावेत आणि त्यांना त्या विभागाविषयी संपूर्ण माहिती मिळू शकेल, म्हणून हा उपक्रम अमृत संस्थेच्या पुढाकाराने राबवण्यात येत आहे. अमृत संस्था सामान्य नागरिक आणि शासकीय यंत्रणा यातील सेतूची भूमिका पार पाडणार आहे. अमृतच्या साथीने होणारा हा 'संवाद सेतू' उपक्रम नक्कीच यशस्वी होणार आहे!
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा २५ जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment