अमृतच्या व्याज परतावा योजनेने रुद्र ॲग्रो एजन्सीला व्यवसायाला नवी दिशा मिळाली आहे.
अमृतच्या व्याज परतावा योजनेने रुद्र ॲग्रो एजन्सीला दिली उभारी. सिल्लोड : आर्थिक अडचणींमुळे व्यवसाय वाढविण्यात अडथळे येत असताना अमृतच्या व्याज परतावा योजनेचा लाभ घेऊन सिल्लोड येथील उद्योजक योगेश माणिकराव कुलकर्णी यांनी आपल्या रुद्र ॲग्रो एजन्सी व्यवसायाला नवी दिशा दिली आहे. श्री. कुलकर्णी यांनी काही वर्षांपूर्वी रुद्र ॲग्रो एजन्सी सुरू केली होती. मात्र व्यवसाय विस्तारासाठी भांडवलाची कमतरता जाणवत होती. यावेळी महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था अमृतचे जिल्हा उपव्यवस्थापक योगेश रोडे यांनी त्यांना वैयक्तिक व्याज परतावा योजनेची माहिती दिली. यानंतर कुलकर्णी यांनी चिखली अर्बन बँक, सिल्लोड शाखेकडून १५ लाख रुपयांचे कर्ज घेतले. या निधीच्या मदतीने त्यांनी व्यवसायात वाढ केली. त्यानंतर अमृतच्या व्याज परतावा योजनेअंतर्गत त्यांना ८७ हजार रुपयांचा व्याज परतावा त्यांच्या बचत खात्यात जमा झाला. याबाबत प्रतिक्रिया देताना कुलकर्णी म्हणाले, "अमृतच्या योजनेमुळे मला मोठा दिलासा मिळाला. शासनाच्या योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळाल्याने व्यवसाय वाढविण्याचा आत्मविश्वास निर्माण झाला आहे. योग्य वेळी मिळालेल्या मार्गदर्शनामुळे आणि आर्थिक पाठबळामुळे आज माझा व्यवसाय चांगल्या पद्धतीने सुरू आहे. त्यांची ही यशोगाथा सर्व समाजासाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. जिद्द व इच्छाशक्ती असेल आणि अमृत सारख्या संस्थेची साथ असेल तर कोणताही व्यवसाय करणे अशक्य नाही, गरज आहे ती फक्त तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांची!
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा २५ जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment