सोलापुरात 'अमृत' संस्थेचा अभिनव उपक्रम; 'ईडीपी' (EDP) कोर्सच्या माध्यमातून तरुणांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.
सोलापुरात 'अमृत' संस्थेचा अभिनव उपक्रम; 'ईडीपी' (EDP) कोर्स ठरतोय नवउद्योजकांसाठी वरदान! अमृत संस्थेचा ईडीपी (EDP) कोर्स: माझ्या उद्योजकतेच्या प्रवासातील एक प्रेरणादायी टप्पा! "अमृत (महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधनी) संस्थेच्या माध्यमातून मी नुकताच ईडीपी (उद्योजकता विकास कार्यक्रम - EDP) कोर्स पूर्ण केला. हा प्रशिक्षण काळ माझ्यासाठी अत्यंत प्रेरणादायी आणि दिशादर्शक ठरला आहे. या कोर्सच्या माध्यमातून मला व्यवसाय कसा सुरू करावा, त्याचे नियोजन, बाजारपेठ आणि आर्थिक व्यवस्थापन याबद्दल खूप काही शिकायला मिळाले". "अमृत संस्था तरुणांना स्वबळावर उभे राहण्यासाठी आणि त्यांच्यातील उद्योजकाला जागे करण्यासाठी अतिशय उत्कृष्ट काम करत आहे. येथील तज्ज्ञ मार्गदर्शक आणि सकारात्मक वातावरणामुळे माझा आत्मविश्वास खूप वाढला आहे. नवउद्योजकांसाठी अमृत संस्था ही खरोखरच एक वरदान ठरत आहे. या उत्तम प्रशिक्षणाबद्दल मी अमृत संस्थेचा मनापासून आभारी आहे!" - हे मत व्यक्त केले आहे श्री.अतुल देशपांडे यांनी. त्यांनी नुकताच अमृत संस्थेचा ईडीपी (EDP) कोर्स यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. तरुणांना स्वावलंबी बनवून त्यांच्यातील सुप्त उद्योजकीय कौशल्यांना वाव देण्यासाठी 'अमृत' (महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधनी) जिल्हा कार्यालय, सोलापूर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला ईडीपी (Entrepreneurship Development Programme - EDP) कोर्स प्रशिक्षणार्थींसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरत आहे. या प्रशिक्षणातून सोलापूर जिल्ह्यातील अनेक तरुणांना उद्योग-व्यवसायाची नवीन दिशा मिळाली आहे. संपर्क व पत्ता तपशील: पत्ता: अमृत (AMRUT) जिल्हा कार्यालय, १०८-ए, श्री साई बिल्डिंग, तिसरा मजला, यतिराज हॉटेलजवळ, सात रस्ता, सोलापूर - ४१३००१. संपर्क क्रमांक: ९११२२२८७६८ / ८६६९५८९८३४ / ९२८४४८३२१६
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा २५ जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment