अमृतच्या ड्रोन प्रशिक्षणामुळे मयूर कुलकर्णींना मिळाली व्यवसायाची नवी संधी

छत्रपती संभाजीनगर येथील मयूर लक्ष्मीकांत कुलकर्णी यांना सोशल मीडियाद्वारे अमृत संस्थेची माहिती मिळाली. त्यांनी अमृत कार्यालयाला भेट देऊन ड्रोन प्रशिक्षणाबाबत माहिती घेतली व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून अर्ज केला. त्यानंतर त्यांची मध्यम कृषी रोटोक्राफ्ट ड्रोन प्रशिक्षणासाठी निवड झाली.

अमृतच्या ड्रोन प्रशिक्षणामुळे मयूर कुलकर्णींना मिळाली व्यवसायाची नवी संधी  मुख्य फोटो
अमृतच्या ड्रोन प्रशिक्षणामुळे मयूर कुलकर्णींना मिळाली व्यवसायाची नवी संधी  अतिरिक्त फोटो

छत्रपती संभाजीनगर : सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या संस्थेची माहिती मिळाल्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथील मयूर लक्ष्मीकांत कुलकर्णी यांनी अमृतच्या जिल्हा कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी अमृतच्या विविध योजनांबाबत माहिती घेतली. जिल्हा व्यवस्थापकांनी त्यांना ड्रोन प्रशिक्षणासाठी आवश्यक कागदपत्रे व अर्ज प्रक्रियेची सविस्तर माहिती दिली. कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर मयूर कुलकर्णी यांनी अमृतच्या पोर्टलवर अर्ज सादर केला. त्यानंतर त्यांची निवड मध्यम कृषी रोटोक्राफ्ट ड्रोन प्रशिक्षण कार्यक्रमासाठी झाली. हे प्रशिक्षण कल्याण येथे दि. २ जून ते १२ जून २०२६ या कालावधीत पार पडले. मयूर कुलकर्णी यांनी हे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथील अमृतच्या विभागीय व जिल्हा कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी जिल्हा टीमच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच ड्रोन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात उपलब्ध होत असलेल्या रोजगार व व्यवसायाच्या संधींबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी मयूर कुलकर्णी यांनी सांगितले की, अमृत संस्थेमुळे त्यांना ड्रोन प्रशिक्षणाची संधी मिळाली. या प्रशिक्षणातून आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती व प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळाला. आगामी काळात ते सलाम किसान या संस्थेसोबत ड्रोन सेवा क्षेत्रात व्यवसाय करण्याचा मानस बाळगत असून शेतकऱ्यांना आधुनिक ड्रोन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सेवा देण्याचा त्यांचा प्रयत्न राहणार आहे. अमृत संस्थेच्या विविध कौशल्य विकास व उद्योजकता प्रशिक्षण उपक्रमांमुळे युवकांना आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण मिळत असून स्वयंरोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होत आहेत. मयूर कुलकर्णी यांचा हा प्रवास इतर युवकांसाठी प्रेरणादायी ठरत असून, अमृतच्या माध्यमातून अधिकाधिक युवकांनी अशा प्रशिक्षणांचा लाभ घ्यावा, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा २४ जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

पत्ता : अमृत विभागीय व जिल्हा कार्यालय, पुंडलिक नगर रोड, सेक्टर -४ सिडको, पाण्याच्या टाकीजवळ, छत्रपती संभाजीनगर - ४३१००९

Publisher: Akshay lambe News publisher name | Date: 23-06-2026 News publication date | Time: 04:14 PM News publication time | Views: 90 Number of times this news has been viewed | District: Chhatrapati_Sambhajinagar Related district of the news
Publisher: Akshay lambe News publisher name | Date: 23-06-2026 News publication date | Time: 04:14 PM News publication time | Views: 90 Number of times this news has been viewed | District: Chhatrapati_Sambhajinagar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement