ऑनलाईन अर्जाची तारीख २९ जूनपर्यंत वाढवली आहे.
'अमृत मानस मित्र' प्रशिक्षण कार्यक्रमाद्वारे मानसिक आरोग्य क्षेत्रात करिअरची सुवर्णसंधी; २९ जून २०२६ पर्यंत ऑनलाईन अर्जाचे आवाहन. हिंगोली , विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य, भावनिक सक्षमीकरण आणि समुपदेशन सेवा अधिक प्रभावी करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था अमृत' (AMRUT) यांच्या वतीने अमृत मानसमित्र समुपदेशक प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात येत आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी महाराष्ट्र शासनाची मानसिक आरोग्य क्षेत्रातील अग्रगण्य संस्था महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था' (MIMH), पुणे ही तांत्रिक व शैक्षणिक भागीदार म्हणून कार्यरत आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP 2020) नुसार शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांच्या समुपदेशनाची तरतूद असून, त्या अनुषंगाने हा कौशल्याधारित व रोजगारक्षम अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे.
प्रशिक्षणाचे स्वरूप व वैशिष्ट्ये: कालावधी व पद्धत: पुणे येथे प्रथम १५ दिवसांचे ऑफलाइन प्रशिक्षण दिले जाईल. त्यानंतर १ महिना प्रॅक्टिकल फील्ड एक्सपोजर (जिल्हा पातळीवरील शाळा/महाविद्यालयात) दिले जाईल. पुढील ३ ते ५ महिने प्रत्यक्ष व्यवसायासाठी MIMH द्वारे मॉनिटरिंग, मेंटरिंग आणि ऑनलाईन मार्गदर्शन केले जाईल.
अभ्यासक्रम: यात मानसिक आरोग्य, विद्यार्थी समुपदेशन, भावनिक आधार, संवाद कौशल्ये, ॲक्टिव्ह लिसनिंग, संकट व्यवस्थापन आणि जीवनकौशल्यांचा समावेश आहे.
अधिकृत प्रमाणपत्र: प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना 'अमृत' व 'MIMH' यांचे संयुक्त अधिकृत प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल.
तज्ज्ञांचे सहकार्य: संपूर्ण प्रशिक्षण MIMH, पुणे च्या तज्ज्ञ मार्गदर्शकांद्वारे घेतले जाईल आणि प्रशिक्षणानंतरही प्रत्यक्ष कामातील अडचणींचे निराकरण करण्यासाठी 'हँड-होल्डिंग सपोर्ट' दिला जाईल.
पात्रता निकष: खालीलपैकी कोणतीही पदव्युत्तर (Post Graduate) पदवी असलेले अमृतच्या लक्षित गटातील उमेदवार या मोफत प्रशिक्षणासाठी पात्र आहेत: १. एम.ए./एम.एस्सी. मानसशास्त्र (Psychology) २. एम.ए./एम.एस्सी. समुपदेशन मानसशास्त्र (Counseling Psychology) ३. मास्टर ऑफ सोशल वर्क (MSW) *(या क्षेत्रात कामाचा अनुभव असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.)
महत्त्वाची टीप: हे प्रशिक्षण अमृतच्या लक्षित गटातील उमेदवारांसाठी पूर्णपणे मोफत आहे. तथापि, प्रशिक्षणादरम्यान राहण्याची, भोजनाची व निवासाची व्यवस्था उमेदवारांनी स्वतःच्या खर्चाने करायची आहे.
अर्ज प्रक्रिया आणि अंतिम मुदत: इच्छुक उमेदवारांनी https://mahaamrut.org.in/ या संकेतस्थळावर सर्व आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन अर्ज करावा. प्राप्त अर्जांची छाननी, ओरिएंटेशन सत्र आणि मुलाखतीद्वारे 'प्रथम येईल त्यास प्राधान्य' या तत्त्वावर उमेदवारांची निवड केली जाईल. पहिल्या बॅचसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत २९ जून २०२६ अशी आहे. मानसिक आरोग्य क्षेत्रात अर्थपूर्ण करिअर घडवू इच्छिणाऱ्या पात्र युवक-युवतींनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन 'अमृत' आणि 'MIMH' संस्थेतर्फे करण्यात आले आहे.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा २५ जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment