'अमृत'-सोलापूर कार्यालयामार्फत जिल्ह्यातील तरुणांना कौशल्य विकास आणि स्वयंरोजगाराच्या संधी.

'अमृत' (AMRUT) सोलापूर कार्यालयामार्फत जिल्ह्यातील तरुणांना कौशल्य विकास आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत.

'अमृत'-सोलापूर कार्यालयामार्फत जिल्ह्यातील तरुणांना कौशल्य विकास आणि स्वयंरोजगाराच्या संधी. मुख्य फोटो
मुख्य फोटो

​'अमृत' (AMRUT) सोलापूर कार्यालयामार्फत जिल्ह्यातील तरुणांना कौशल्य विकास आणि स्वयंरोजगाराच्या संधी. सोलापूर: महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था 'अमृत' (महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी) च्या सोलापूर जिल्हा कार्यालयातर्फे खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील (EWS) तरुण-तरुणींसाठी विविध कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता प्रशिक्षण योजना राबविल्या जात आहेत. या योजनांची माहिती जास्तीत जास्त गरजूंपर्यंत पोहोचावी, यासाठी सोलापूर जिल्हा कार्यालयात विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. उद्योजकतेला चालना: स्वयंरोजगार सुरू करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी उद्योजकता विकास प्रशिक्षण (EDP) कार्यक्रमांचे आयोजन केले जात असून, प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र आणि मार्गदर्शन पुरवले जात आहे. प्रशिक्षणाचा मुख्य हेतू: वित्तीय नियोजन, कर्ज योजना, परवाने आणि बाजारपेठ व्यवस्थापन याबद्दल नवउद्योजकांना मार्गदर्शन. पात्रता: खुल्या प्रवर्गातील वार्षिक उत्पन्न ८ लाखांच्या आत असणारे युवक-युवती. पत्ता (Address): ​अमृत (AMRUT) जिल्हा कार्यालय, १०८-ए, श्री साई बिल्डिंग, तिसरा मजला, यतिराज हॉटेलजवळ, सात रस्ता, सोलापूर - ४१३००१ संपर्क क्रमांक : ​९११२२२८७६८ (9112228768) ​८६६९५८९८३४ (8669589834) ​९२८४४८३२१६ (9284483216)


अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा २५ जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

Publisher: Shreyas Kulkarni,Birudev Waghmode, Arya kulkarni News publisher name | Date: 23-06-2026 News publication date | Time: 11:29 AM News publication time | Views: 71 Number of times this news has been viewed | District: Solapur Related district of the news
Publisher: Shreyas Kulkarni,Birudev Waghmode, Arya kulkarni News publisher name | Date: 23-06-2026 News publication date | Time: 11:29 AM News publication time | Views: 71 Number of times this news has been viewed | District: Solapur Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement