छत्रपती संभाजीनगर येथील अमृतच्या विभागीय जिल्हा कार्यालयास केंद्र शासनाच्या डिपार्टमेंट ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट ऑब्झर्वेशनचे अधिकारी आनंद पटवर्धन यांनी सदिच्छा भेट दिली.
छत्रपती संभाजीनगर येथील अमृत संस्थेच्या विभागीय व जिल्हा कार्यालयाला डिपार्टमेंट ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट ऑब्झर्वेशनचे अधिकारी श्री. आनंद पटवर्धन यांनी सदिच्छा भेट दिली.
या भेटीदरम्यान त्यांनी अमृत (महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी) या स्वायत्त संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना आणि प्रशिक्षण कार्यक्रमांची माहिती घेतली. यात ड्रोन प्रशिक्षण, अमृत बेकरी, सोलर इन्स्टॉलेशन टेक्निशियन (अमृत सूर्यमित्र), आयात-निर्यात, अमृतपेठ, आरीवर्क, ब्युटी पार्लर (अमृत ग्लॅमर) तसेच उद्योग कौशल्यवर्धन प्रशिक्षण (ईडीपी) अशा उपक्रमांचा समावेश होता.
श्री. पटवर्धन यांनी लक्षित गटातील नागरिकांपर्यंत या योजनांचा लाभ पोहोचवण्यासाठी अमृत संस्था कोणत्या पद्धतीने काम करते, याबाबतही सविस्तर माहिती जाणून घेतली. नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी सुरू असलेले काम, कौशल्य विकास उपक्रम आणि लाभार्थी केंद्रित योजना याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
अमृत संस्थेच्या छत्रपती संभाजीनगर विभागीय व जिल्हा कार्यालयाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा २५ जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/ पत्ता : अमृत विभागीय व जिल्हा कार्यालय, पुंडलिक नगर रोड, सेक्टर -४ सिडको, पाण्याच्या टाकीजवळ, छत्रपती संभाजीनगर - ४३१००९
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment