महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या राज्य शासनाच्या संस्थेकडून मोहित नंदकिशोर चांडक यांना आतापर्यंत तब्बल ₹१,७२,९६५ इतका वैयक्तिक कर्जावरील व्याज परतावा मिळाला आहे.
महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या राज्य शासनाच्या संस्थेकडून मोहित नंदकिशोर चांडक यांना आतापर्यंत तब्बल ₹१,७२,९६५ इतका वैयक्तिक कर्जावरील व्याज परतावा मिळाला आहे.
याबद्दल त्यांनी अमृत संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक यांचे मनःपूर्वक आभार मानले. तसेच विभागीय व्यवस्थापक देवदत्त पंडित यांचेही त्यांनी विशेष आभार व्यक्त केले. मोहित चांडक यांनी सांगितले की, या योजनेमुळे त्यांच्या व्यवसायाला मोठा आधार मिळाला आहे. त्यांचे सिमेंटचे दुकान असून, आर्थिक मदतीमुळे व्यवसाय अधिक सक्षमपणे पुढे नेणे शक्य झाले आहे.
तसेच त्यांनी सांगितले की, समाजातील प्रत्येक घटकाने या योजनेचा लाभ घ्यावा. इतरही अनेक योजना उन्नती देणाऱ्या असून नागरिकांनी त्यांचा लाभ घ्यावा, असे त्यांनी आवाहन केले.
योजनेची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्हा व्यवस्थापक ऋषिकेश खराटे यांचेही त्यांनी आभार मानले.
अधिक माहितीसाठी खालील पत्त्यावर संपर्क साधावा-
अमृत वर्धा जिल्हा कार्यालय, प्रशासकीय भवन, तळमजला, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर ,सिव्हिल लाईन, वर्धा
मोबाईल नंबर - 9112227632
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना शासकीय संस्था, आयोग किंवा महामंडळ यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment