इंडो-जर्मन टूल रूम व अमृतचा विशेष उपक्रम; खुल्या प्रवर्गातील युवक-युवतींसाठी मोफत कौशल्य प्रशिक्षणाची सुवर्णसंधी

राज्यातील युवकांना उद्योग क्षेत्राच्या गरजांनुसार आधुनिक व रोजगाराभिमुख कौशल्ये उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.

इंडो-जर्मन टूल रूम व अमृतचा विशेष उपक्रम; खुल्या प्रवर्गातील युवक-युवतींसाठी मोफत कौशल्य प्रशिक्षणाची सुवर्णसंधी मुख्य फोटो
इंडो-जर्मन टूल रूम व अमृतचा विशेष उपक्रम; खुल्या प्रवर्गातील युवक-युवतींसाठी मोफत कौशल्य प्रशिक्षणाची सुवर्णसंधी अतिरिक्त फोटो

जालना: महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) आणि इंडो-जर्मन टूल रूम (IGTR) यांच्या संयुक्त विद्यमाने खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील युवक-युवतींसाठी मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

राज्यातील युवकांना उद्योग क्षेत्राच्या गरजांनुसार आधुनिक व रोजगाराभिमुख कौशल्ये उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. या प्रशिक्षणामध्ये उमेदवारांना अत्याधुनिक यंत्रसामग्री व तंत्रज्ञानाच्या साहाय्याने प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना अधिकृत प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार असून नोकरी तसेच स्वयंरोजगारासाठी आवश्यक मार्गदर्शन व सहाय्यही उपलब्ध करून दिले जाणार आहे.

या उपक्रमांतर्गत प्रशिक्षण, निवास व भोजनाचा संपूर्ण खर्च अमृत संस्थेमार्फत केला जाणार आहे. छत्रपती संभाजीनगर येथील इंडो-जर्मन टूल रूम केंद्रात निवासी प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध असून पुणे, नागपूर, कोल्हापूर आणि वाळूंज येथील केंद्रांमध्ये अनिवासी प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध आहे.

प्रशिक्षणासाठी खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गातील १८ ते ४० वर्षे वयोगटातील पात्र युवक-युवती अर्ज करू शकतात. संबंधित अभ्यासक्रमानुसार आवश्यक शैक्षणिक पात्रता व इतर अटी लागू राहतील.

इच्छुक उमेदवारांनी www.mahaamrut.org.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करावा. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे सादर करणे बंधनकारक राहील. प्राप्त अर्जांची छाननी करून पात्र उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.

या उपक्रमाचा लाभ घेऊन युवक-युवतींनी आपली कौशल्ये विकसित करून रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन अमृत संस्थेतर्फे करण्यात आले आहे.


अधिक माहितीसाठी संपर्क:

जिल्हा कार्यालय, दुसरा मजला, प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय, जालना

मो. ७३९१०६५४७४

Publisher: नितीन खेकाळे News publisher name | Date: 22-06-2026 News publication date | Time: 11:13 AM News publication time | Views: 104 Number of times this news has been viewed | District: Jalna Related district of the news
Publisher: नितीन खेकाळे News publisher name | Date: 22-06-2026 News publication date | Time: 11:13 AM News publication time | Views: 104 Number of times this news has been viewed | District: Jalna Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement