अमृत संस्थेतर्फे अ‍ॅडव्हान्स ब्युटी पार्लर मोफत व्यावसायिक प्रशिक्षण कार्यक्रम सुरू

स्वयंरोजगाराच्या दृष्टीने छत्रपती संभाजीनगरमधील महिला व युवती होणार सिद्ध

अमृत संस्थेतर्फे अ‍ॅडव्हान्स ब्युटी पार्लर मोफत व्यावसायिक प्रशिक्षण कार्यक्रम सुरू मुख्य फोटो
अमृत संस्थेतर्फे अ‍ॅडव्हान्स ब्युटी पार्लर मोफत व्यावसायिक प्रशिक्षण कार्यक्रम सुरू अतिरिक्त फोटो

छत्रपती संभाजीनगर : ॲडव्हान्स ब्युटी पार्लर या विषयावरच्या महिन्याभराच्या मोफत प्रशिक्षण कार्यक्रमाची सुरुवात २३ डिसेंबर २०२५ रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये झाली. खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी काम करणारी अमृत ही राज्य शासनाची संस्था आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी) यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ब्युटी पार्लर क्षेत्रातील नोकरीच्या आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याच्या संधी, उद्योजकीय कौशल्ये, बाजारपेठेचे नियोजन आदी बाबींचे प्रशिक्षण यात देण्यात येणार आहे. तसेच अमृत संस्थेच्या योजना, कर्जविषयक मार्गदर्शन आणि विविध शासकीय योजनांची माहितीही देण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे युवती व महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी हातभार लागणार आहे.

या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी अमृत संस्थेचे राज्य व्यवस्थापक दीपक जोशी , विभागीय उपव्यवस्थापक ओंकार शेटे मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. 'एमसीईडी'चे विभागीय अधिकारी सुधाम थोटे, अमृत संस्थेचे छत्रपती संभाजीनगर जिल्हा व्यवस्थापक अक्षय लंबे आणि 'एमसीईडी'च्या प्रकल्पाधिकारी सौ. भारती सोसे हेदेखील या वेळी उपस्थित होते.

हा प्रशिक्षण कार्यक्रम २४ जानेवारी २०२६पर्यंत सुरू राहणार आहे. सुदर्शननगर (एन-११, हडको) येथील ड्रीम्स ब्युटी अँड ट्रेनिंग सेंटर येथे हे प्रशिक्षण सुरू आहे. या प्रशिक्षणामुळे जिल्ह्यातील महिलांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार असून, त्यांचा आत्मविश्वास वाढणार आहे. आर्थिक स्वावलंबनाच्या दिशेने त्यांची वाटचाल होण्यास मदत होणार आहे.

या आणि अशाच अधिक योजनांच्या, प्रशिक्षण कार्यक्रमांच्या माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील अमृत कार्यालयाशी संपर्क साधावा.

अक्षय चंद्रकांत लंबे - 7391065475
छ. संभाजीनगर जिल्हा व्यवस्थापक, अमृत

योगेश भास्कर रोडे - 94032 00606
जिल्हा उपव्यवस्थापक, अमृत

पत्ता : अमृत संस्थेचे विभागीय व जिल्हा कार्यालय, पुंडलिक नगर रोड, सेक्टर-४, सिडको, पाण्याच्या टाकीजवळ, छत्रपती संभाजीनगर- ४३१००९

अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.

अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/

Publisher: Akshay lambe News publisher name | Date: 23-12-2025 News publication date | Time: 05:38 PM News publication time | Views: 197 Number of times this news has been viewed | District: chhatrapati_sambhajinagar Related district of the news
Publisher: Akshay lambe News publisher name | Date: 23-12-2025 News publication date | Time: 05:38 PM News publication time | Views: 197 Number of times this news has been viewed | District: chhatrapati_sambhajinagar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words