सोलापुरात 'अमृत' संस्थेतर्फे 'EDP' प्रशिक्षणाचा प्रारंभ झाला आहे.
"उद्योजकतेकडून स्वावलंबनाकडे!" सोलापुरात 'अमृत' संस्थेतर्फे 'EDP' प्रशिक्षणाचा यशस्वी प्रारंभ सोलापूर: तरुणांमधील कौशल्य, आत्मविश्वास आणि उद्योजकतेला चालना देण्यासाठी 'अमृत' सोलापूर परिवाराच्या वतीने विशेष उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे (EDP) उद्घाटन करण्यात आले. "उद्योजकतेकडून स्वावलंबनाकडे" हे ध्येय समोर ठेवून या वर्गांची सुरुवात झाली आहे. या प्रशिक्षण सत्रात नवउद्योजकांना व्यवसायाच्या विविध संधी, वित्तीय नियोजन, शासकीय परवाने आणि थेट बाजारपेठेशी (Market Linking) जोडणी याविषयी तज्ज्ञांचे मोलाचे मार्गदर्शन मिळणार आहे. खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील जास्तीत जास्त युवकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सोलापूर जिल्हा कार्यालयाने केले आहे. प्रशिक्षणाचा मुख्य हेतू: वित्तीय नियोजन, कर्ज योजना, परवाने आणि बाजारपेठ व्यवस्थापन याबद्दल नवउद्योजकांना मार्गदर्शन. पात्रता: खुल्या प्रवर्गातील वार्षिक उत्पन्न ८ लाखांच्या आत असणारे युवक-युवती. पत्ता (Address): अमृत (AMRUT) जिल्हा कार्यालय, १०८-ए, श्री साई बिल्डिंग, तिसरा मजला, यतिराज हॉटेलजवळ, सात रस्ता, सोलापूर - ४१३००१ संपर्क क्रमांक : ९११२२२८७६८ (9112228768) ८६६९५८९८३४ (8669589834) ९२८४४८३२१६ (9284483216)
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना शासकीय संस्था, आयोग किंवा महामंडळ यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment