अमृत कार्यालय, नांदेड येथे "योग साधना" वर्ग

अमृत कार्यालय, नांदेड येथे "योग साधना" वर्ग घेऊन जागतिक योग दिन साजरा करण्यात आला.

अमृत कार्यालय, नांदेड येथे "योग साधना" वर्ग  मुख्य फोटो
अमृत कार्यालय, नांदेड येथे "योग साधना" वर्ग  अतिरिक्त फोटो

अमृत कार्यालय, नांदेड येथे "योग साधना" वर्ग घेऊन जागतिक योग दिन साजरा करण्यात आला. जागतिक योग दिनानिमित्त अमृत कार्यालय, नांदेड येथे उपव्यवस्थापक श्री. विश्वेश्वर जोशी यांनी योग वर्ग घेतला. त्यात योग साधनेसाठी नांदेड जिल्हा व्यवस्थापक श्री. सौरभ कुलकर्णी, अमृत सखी सौ. मनीषा कुनसावळीकर, संजना कुलकर्णी व ऋतिका विभुते उपस्थित होते. योग वर्गात प्राणायाम व काही आसने घेण्यात आली. योग वर्गाचा समारोप श्री. सौरभ कुलकर्णी यांनी गायलेल्या -राष्ट्रभूमी गान से | गुंजता रहे गगन- या गीताने झाला. दैनंदिन आयुष्यात आपण आपल्या आरोग्यासाठी थोडा वेळ काढणे अत्यावश्यक आहे. या योगदिनानिमित्त हा संदेश अमृतच्या माध्यमातून लोकांपर्यंत जावा,यासाठी या वर्गाचे आयोजन करण्यात आले होते.


अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना शासकीय संस्था, आयोग किंवा महामंडळ यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/

Publisher: विश्वेश्वर वासुदेवराव जोशी News publisher name | Date: 22-06-2026 News publication date | Time: 10:56 AM News publication time | Views: 67 Number of times this news has been viewed | District: Nanded Related district of the news
Publisher: विश्वेश्वर वासुदेवराव जोशी News publisher name | Date: 22-06-2026 News publication date | Time: 10:56 AM News publication time | Views: 67 Number of times this news has been viewed | District: Nanded Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 1 Comments

A
Akankasha Kulkarni
22-06-2026 01:50 PM

Chan आहे

Write a Comment
0 / 50 words
Advertisement