आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त अमृत रायगड कार्यालयात योगदिन साजरा झाला.
आपल्या देशाचे, भारताचे माननीय पंतप्रधान आ. नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्र महासभेत भाषण करताना संपूर्ण जगाला योगाचे महत्त्व पटवून दिले. संयुक्त राष्ट्र महासभेने अधिकृतपणे २१ जून हा 'आंतरराष्ट्रीय योग दिन' म्हणून घोषित केला आहे. अप्राप्त वस्तू प्राप्त होणे याला योग म्हणतात. प्राणायाम, ध्यान आणि आसनांमुळे मानसिक एकाग्रता वाढते. यातून आपल्याला जे साध्य करायचे आहे ते साध्य होते. नेमून दिलेले कर्म विहित वेळेत आणि सातत्याने केले तर आपण चांगल्या विश्वाची निर्मिती करू शकतो. एकाग्रता मिळवण्यासाठी योग केला पाहिजे; योगात सातत्य आवश्यक आहे आणि आयुष्यात शिस्तीची गरज आहे. शिस्त योगाद्वारे लागते आणि आरोग्य सुधारते. आज प्रत्येकाला ताण-तणावाचा सामना करावा लागतो. त्यामुळे तणावमुक्त राहण्यासाठी आपण सर्वांनी आपल्या जीवनशैलीमध्ये नियमितपणे योग आणि व्यायामाचा समावेश करावा. योग हा फक्त व्यायाम नसून योगामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुदृढ राहते. नियमित योगासने केल्याने शरीराला ऊर्जा प्राप्त होते. योगामुळे मनःशांती तर मिळतेच, शिवाय तणाव दूर होऊन एकाग्रता वाढण्यासही मदत होते. योगदिनानिमित्त आलेल्या मान्यवरांनी आपल्या दैनंदिन आयुष्यातील योगाचे महत्त्व सांगितले. अमृत रायगड जिल्हा कार्यालय, अलिबागच्या पटांगणात हा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. यानिमित्ताने योगगुरु श्री. कुमार जोगळेकर यांनी परिसरातील मुलांना योगाचे प्रात्यक्षिक दाखवून करून घेतले. योगगुरु श्री. कुमार जोगळेकर यांचे स्वागत व आभार जिल्हा व्यवस्थापक श्री. शैलेश विनायक मराठे यांनी मानले. यावेळी अमृत संस्थेतर्फे राबवल्या जाणाऱ्या 'अमृत वर्ग' या उपक्रमाचीही माहिती देण्यात आली. या संस्कार उपक्रमामुळे मुलांना नियमितपणे योग प्रशिक्षण मिळते, त्यामुळे तेथे उपस्थित पालकांनी समाधान व्यक्त केले.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना शासकीय संस्था, आयोग किंवा महामंडळ यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment