कोल्हापूर: करवीर तालुक्यात २५ व २६ जून रोजी अमृत निवासी योग वर्गाचे आयोजन

अमृततर्फे कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील वाशी या गावात खास 'अमृत निवासी मेळा' अंतर्गत अमृत योगवर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. हा दोन दिवसीय वर्ग दिनांक २५ जून आणि २६ जून २०२६ रोजी आयोजित केलेला आहे.

कोल्हापूर:  करवीर तालुक्यात २५ व २६ जून रोजी  अमृत निवासी योग वर्गाचे आयोजन मुख्य फोटो
मुख्य फोटो

आजच्या धावपळीच्या युगात विद्यार्थ्यांचा मानसिक ताण कमी व्हावा आणि त्यांची शिकण्याची आवड वाढावी, यासाठी या शिबिराची विशेष रचना करण्यात आली आहे. यात वेगवेगळ्या प्रकारच्या मैदानी आणि बौद्धिक खेळांचे आयोजन केले जाईल. नियमित योगाभ्यासामुळे शरीराची लवचिकता वाढते, स्नायू बळकट होतात तसेच तणाव आणि चिंता कमी होण्यास मदत मिळते. योगामुळे एकाग्रता, आत्मविश्वास आणि मानसिक शांतता वाढते. आधुनिक धकाधकीच्या जीवनशैलीत निरोगी व संतुलित जीवन जगण्यासाठी योग हा अत्यंत प्रभावी उपाय मानला जातो.

अमृत वर्गाची प्रमुख वैशिष्ट्ये:

अद्ययावत प्रशिक्षण: व्यक्तिमत्त्व विकासावर विशेष भर.

हे निवासी शिबिर केवळ दोन दिवसांचा वर्ग नसून तुमच्या भविष्याची आणि आयुष्याची नवी दिशा ठरवणारा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. आजच्या स्पर्धात्मक युगात स्वतःला सिद्ध करण्यासाठी आवश्यक असणारी कौशल्ये, आत्मविश्वास आणि अचूक मार्गदर्शन या शिबिराच्या माध्यमातून अत्यंत रंजक पद्धतीने (खेळांच्या माध्यमातून) दिले जाणार आहे.

विद्यार्थ्यांनी या संधीचे फायदा घ्यावा . आपल्या प्रगतीचा मार्ग सुकर करण्यासाठी आणि आयुष्याला एक नवी उंची देण्यासाठी या शिबिराचा सर्वांनी जास्तीत जास्त उपयोग करून घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

ठिकाण: वाशी, तालुका- करवीर, जिल्हा- कोल्हापूर.

दिनांक: २५ आणि २६ जून २०२६.


अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना शासकीय संस्था, आयोग किंवा महामंडळ यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/

Publisher: Abhijeet Kulkarni News publisher name | Date: 20-06-2026 News publication date | Time: 03:20 PM News publication time | Views: 121 Number of times this news has been viewed | District: Kolhapur Related district of the news
Publisher: Abhijeet Kulkarni News publisher name | Date: 20-06-2026 News publication date | Time: 03:20 PM News publication time | Views: 121 Number of times this news has been viewed | District: Kolhapur Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 1 Comments

R
RAJENDRA KANADE
20-06-2026 06:43 PM

छान वर्ग घेतला, योग दिनानिमित्तने

Write a Comment
0 / 50 words
Advertisement