छत्रपती संभाजीनगरच्या स्मिता कुलकर्णी यांना अमृतच्या व्याज परतावा योजनेचा लाभ

अमृत स्वायत्त संस्थेच्या वैयक्तिक व्याज परतावा योजनेअंतर्गत छत्रपती संभाजीनगर येथील सौ. स्मिता सुमित कुलकर्णी यांना ₹३६,७९२ इतका व्याज परतावा मिळाला आहे.

छत्रपती संभाजीनगरच्या स्मिता कुलकर्णी यांना  अमृतच्या व्याज परतावा योजनेचा लाभ   मुख्य फोटो
मुख्य फोटो

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था यांच्या वैयक्तिक व्याज परतावा योजनेमुळे अनेक उद्योजकांना आर्थिक आधार मिळत असून त्याचाच लाभ सौ. स्मिता सुमित कुलकर्णी यांना मिळाला आहे. या योजनेअंतर्गत त्यांच्या बँक खात्यात ₹३६,७९२ इतकी व्याज परताव्याची रक्कम जमा करण्यात आली आहे.

सौ. स्मिता कुलकर्णी यांचा "माऊली मंडप डेकोरेशन" हा स्वतःचा व्यवसाय आहे. व्यवसायाच्या वाढीसाठी त्यांनी देवगिरी नागरी सहकारी बँकेकडून व्यवसाय कर्ज घेतले होते. कर्जाची नियमित परतफेड केल्यानंतर त्यांना अमृतच्या वैयक्तिक व्याज परतावा योजनेचा लाभ मिळाला.

रक्कम खात्यात जमा झाल्यानंतर त्यांनी अमृतच्या छत्रपती संभाजीनगर विभागीय व जिल्हा कार्यालयाला भेट देऊन संस्थेप्रती कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी त्यांनी या योजनेमुळे व्यवसायाला मोठा आर्थिक आधार मिळाल्याचे सांगितले. तसेच इतर महिला उद्योजिकांनाही अमृतच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

अमृतच्या विविध योजनांमुळे अनेक महिला व युवक आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहेत. पात्र लाभार्थ्यांनी या योजनांची माहिती घेऊन जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

अमृत स्वायत्त संस्था तसेच जिल्हा टीमच्या वतीने सौ. स्मिता सुमित कुलकर्णी यांचे अभिनंदन करण्यात आले. अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा २५ जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/ अधिक माहितीसाठी संपर्क : अमृत विभागीय व जिल्हा कार्यालय, पुंडलिकनगर रोड, सेक्टर-४, सिडको, हनुमान नगर पाण्याच्या टाकीजवळ, छत्रपती संभाजीनगर – ४३१००९. मो. क्र. : ७३९१०६५४७५ / ९४०३२००६०६.

Publisher: Akshay lambe News publisher name | Date: 13-06-2026 News publication date | Time: 02:13 PM News publication time | Views: 12 Number of times this news has been viewed | District: Chhatrapati_Sambhajinagar Related district of the news
Publisher: Akshay lambe News publisher name | Date: 13-06-2026 News publication date | Time: 02:13 PM News publication time | Views: 12 Number of times this news has been viewed | District: Chhatrapati_Sambhajinagar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement