अमृत सखी मंजू कुलकर्णी यांनी छत्रपती संभाजीनगर येथील चाटे शाळेला भेट देऊन अमृत योजना, अमृत वर्ग आणि अमृत मानस मित्र या उपक्रमांची माहिती दिली.
छत्रपती संभाजीनगर, दि. १३ जून २०२६ :
बीड बायपास, सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर येथील चाटे शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. स्मिता पानकडे यांची अमृत सखी मंजू कुलकर्णी यांनी आज भेट घेतली. यावेळी त्यांना अमृत योजना, अमृत वर्ग तसेच अमृत मानस मित्र या उपक्रमांची सविस्तर माहिती देण्यात आली.
या उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, बौद्धिक आणि मानसिक विकासाला चालना मिळणार असून विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक विचार, संस्कार आणि व्यक्तिमत्त्व विकास घडविण्यास मदत होणार असल्याचे अमृत सखी मंजू कुलकर्णी यांनी सांगितले. मुख्याध्यापिका सौ. पानकडे यांनीही या उपक्रमांविषयी उत्सुकता दर्शवत सकारात्मक प्रतिसाद दिला.
चर्चेदरम्यान चाटे शाळेमध्ये लवकरच अमृत वर्ग सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. या भेटीमुळे शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नवीन उपक्रम राबविण्याच्या दृष्टीने सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा २५ जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment