अमृत कडुन वैयक्तिक कर्ज व्याज परतावा मिळाल्यामुळे नायगांव च्या मुक्ता गजानन ऊत्तरवार यांना मिळाली नवसंजीवनी.
अमृत नांदेड, नायगांव येथील आर्यवैश्य समाज प्रोव्हिजन स्टोअर्स व्यवसायीक सौ. मुक्ता गजानन ऊत्तरवार यांना अमृत महामंडळाच्या (महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था ) वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेच्या माध्यमातून त्यांच्या व्यवसायीक व्याजाचा परतावा मिळाला आहे. अमृत च्या व्याज परतावा योजनेच्या माध्यमातून मिळालेल्या आर्थिक सहकार्यातून व्यवसाय वृद्धांसाठी एक नवसंजीवनी मिळाली अशी त्यांची भावना आहे. या योजनेसाठी अमृत नांदेड जिल्हा उपव्यवस्थापक श्री.विश्वेश्वर जोशी यांची मदत व मार्गदर्शन लाभत आहे.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा २५ जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment