मानसिक आरोग्य क्षेत्रात करिअरची सुवर्णसंधी : अमृत मानसमित्र समुपदेशक प्रशिक्षण अर्ज प्रक्रियेस सुरुवात

मानसिक आरोग्य क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या मानसशास्त्र व सामाजिक कार्य क्षेत्रातील युवक-युवतींसाठी मोफत प्रशिक्षण. प्रशिक्षणानंतर रोजगार व स्वयंरोजगाराच्या विविध संधी उपलब्ध होणार.

मानसिक आरोग्य क्षेत्रात करिअरची सुवर्णसंधी : अमृत मानसमित्र समुपदेशक प्रशिक्षण अर्ज प्रक्रियेस सुरुवात मुख्य फोटो
मुख्य फोटो

मानसिक आरोग्य क्षेत्रात करिअरची सुवर्णसंधी: अमृत मानस मित्रचे मोफत प्रशिक्षण: रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध.

मानसिक आरोग्य क्षेत्रातील नाविन्यपूर्ण उपक्रम

आजच्या वेगाने बदलणाऱ्या शैक्षणिक आणि सामाजिक वातावरणामध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक ताणतणाव, भावनिक समस्या, वर्तनात्मक अडचणी, सोशल मीडिया व डिजिटल व्यसन, करिअरविषयक संभ्रम, तसेच मानसिक आरोग्याशी संबंधित विविध आव्हानांना सामोरे जावे लागत आहे; आणि त्यामुळे अनेक गंभीर घटना आणि समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अशा परिस्थितीत शाळा आणि महाविद्यालयांमध्ये प्रशिक्षित समुपदेशकांची गरज मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ही गरज आणि समस्या लक्षात घेऊन अमृत संस्थेने ही सामाजिक समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे.

महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (AMRUT) मार्फत "अमृत मानसमित्र समुपदेशक प्रशिक्षण कार्यक्रम" राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था (MIMH), पुणे ही महाराष्ट्र शासनाची मानसिक आरोग्य क्षेत्रातील अग्रगण्य संस्था तांत्रिक भागीदार (Technical Partner) म्हणून कार्यरत राहणार आहे. MIMH ही मानसिक आरोग्य क्षेत्रातील शिक्षण, प्रशिक्षण, संशोधन आणि क्षमता विकासासाठी कार्यरत असलेली महाराष्ट्र शासनाची प्रमुख संस्था असून मानसशास्त्रज्ञ, समुपदेशक, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध मानसिक आरोग्य व्यावसायिकांच्या प्रशिक्षणामध्ये संस्थेचा दीर्घ अनुभव आहे. या अनुभवाच्या आधारे प्रशिक्षणाचा अभ्यासक्रम, प्रशिक्षण पद्धती, पर्यवेक्षण (Supervision) आणि गुणवत्ता नियंत्रणाची जबाबदारी MIMH मार्फत पार पाडण्यात येणार आहे.

अमृत संस्थेमार्फत "समुपदेशक प्रशिक्षण कार्यक्रम" राबविण्यात येत असून मानसशास्त्र, समुपदेशन आणि सामाजिक कार्य क्षेत्रातील युवक-युवतींसाठी स्वयंरोजगार, व्यावसायिक विकास आणि समाजोपयोगी कार्यासाठी रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होत आहेत.

पहिल्या बॅचसाठी अर्जाची मुदत -

अमृत मानस मित्र समुपदेशक प्रशिक्षण कार्यक्रमाच्या पहिल्या बॅचसाठी १५ जून ते २२ जून २०२६ या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल. छाननीअंती पात्र झालेल्या उमेदवारांना ईमेल/मेसेजद्वारे कळविण्यात येईल. मुदतीत प्रवेश न घेतल्यास प्रतीक्षा यादीतील अन्य उमेदवारांना संधी दिली जाईल.   इतर माहितीसाठी संपर्क : संपर्क तपशील- फोन+91 73910 65471 / श्रीकांत धोतरे( हिंगोली जिल्हा व्यवस्थापक अमृत) पत्ता -* प्रशासकीय इमारत जिल्हाधिकारी कार्यालय, तळमजला, चाइल्ड हेल्पलाइन कार्यालय, मध्ये महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अमृत,हिंगोली जिल्हा कार्यालय 431513. ई-मेल - amrut.hingoli.dm@gmail.com

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा २५ जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/    

Publisher: Shrikant Dhotre News publisher name | Date: 10-06-2026 News publication date | Time: 01:39 PM News publication time | Views: 165 Number of times this news has been viewed | District: Hingoli Related district of the news
Publisher: Shrikant Dhotre News publisher name | Date: 10-06-2026 News publication date | Time: 01:39 PM News publication time | Views: 165 Number of times this news has been viewed | District: Hingoli Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 1 Comments

J
Jyoti Chandrakant Naraje
17-06-2026 08:51 PM

Want to help the stressed person to over come from it

Write a Comment
0 / 50 words
Advertisement