वर्धामनेरी गावातील भारती भुतडा यांना आटा चक्की व्यवसायासाठी योजनेचा लाभ
वर्धा : खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्यरत असलेली अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था लक्ष्यित गटांच्या उन्नतीसाठी विविध प्रकारच्या योजना राबवते. त्यातील कर्ज व्याजपरतावा योजनेमुळे वर्धामनेरी (ता. आर्वी, जि. वर्धा) या गावातील भारती भुतडा यांची आर्थिक सक्षमतेकडे वाटचाल सुरू झाली आहे. त्यांच्या आटा चक्की या व्यवसायासाठी वैयक्तिक कर्जावरील व्याजपरतावा मंजूर झाला आहे.
भारती खिवराज भुतडा यांनी नवीन व्यवसाय सुरू करण्याच्या उद्देशाने आटा चक्की खरेदी करून अमृत संस्थेकडे व्यावसायिक वैयक्तिक कर्ज व्याजपरतावा योजनेसाठी अर्ज सादर केला होता. या अर्जाची जिल्हा स्तरावर, तसेच विभागीय स्तरावर छाननी करण्यात आली. मुख्यालयाच्या मंजुरीनंतर त्यांना वैयक्तिक कर्जावरील व्याजपरताव्याची रक्कम त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे.
या व्याजपरताव्यामुळे त्यांच्या व्यवसायाच्या प्रगतीला मोठी मदत होणार असून, त्यांना स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभे राहण्यास बळ मिळणार आहे. याबद्दल भारती खिवराज भुतडा आणि खिवराज भुतडा यांनी अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक ऋषीकेश खराटे, अमृतमित्र धीरज राठी, संगणकसखी वैष्णवी, तसेच अमृत मुख्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारीवर्गाचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. अमृत संस्थेच्या विविध योजना जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण सहकार्य करू, असे त्यांनी नमूद केले आहे.
तुम्हालाही घ्यायचा आहे का अमृत संस्थेच्या या किंवा अन्य योजनांचा लाभ?
अधिक माहितीसाठी संपर्क :
ऋषीकेश खराटे, वर्धा जिल्हा व्यवस्थापक, अमृत
9112227632
अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.
अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment