पवित्र पुरुषोत्तम अर्थात अधिक मासाच्या निमित्ताने शेंद्रा येथील गोपालकृष्ण गोशाळेत आयोजित गोपूजन उपक्रमात अमृत संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला.
छत्रपती संभाजीनगर:- पवित्र पुरुषोत्तम अर्थात अधिक मासाच्या निमित्ताने शेंद्रा येथील गोपालकृष्ण गोशाळेत गोपूजन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. १७ मे ते १५ जून या कालावधीत दररोज सायंकाळी गोपूजन कार्यक्रम पार पडणार असून भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. पुरुषोत्तम मास हा भगवान श्रीविष्णूंना समर्पित मानला जातो. या महिन्यात जप, तप, दान आणि सेवा यांना विशेष महत्त्व दिले जाते. या धार्मिक पार्श्वभूमीवर गोसेवा आणि गोपूजनाचा संकल्प करून समाजात धर्म, संस्कृती आणि सेवाभाव रुजविण्याचा प्रयत्न या उपक्रमातून केला जात आहे. गोपालकृष्ण गोशाळा, शेंद्रा येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून गोमातेचे भारतीय संस्कृतीतील महत्त्व अधोरेखित करण्यासाठी विविध धार्मिक उपक्रमही राबविण्यात येणार आहेत. दूध, शेण आणि गोमूत्र यांचे धार्मिक तसेच औषधी महत्त्व असल्याने गोसेवा ही केवळ सेवा नसून एक पवित्र साधना असल्याची भावना आयोजकांनी व्यक्त केली आहे. अमृत संस्थेतर्फे अधिक मासाच्या निमित्ताने देशी गोवंश संरक्षण आणि गो आधारित पदार्थ (धूप, फिनेल, साबण) निर्मितीच्या चर्चा आणि नियोजनासाठी गोशाळेला भेट देण्यात आली आणि पुरुषोत्तम मासानिमित्त गोपूजन करण्यात आले. याप्रसंगी राज्य समन्वयक दीपक जोशी, विभागीय व्यवस्थापक अमित सामंत, विभागीय उपव्यवस्थापक ओंकार शेटे, अमृत जिल्हा व्यवस्थापक अक्षय लंबे आणि जालना जिल्हा व्यवस्थापक नितीन खेकाळे उपस्थित होते.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment