स्त्री शक्तीच्या उद्योजकतेला मिळणार चालना!!

'अमृत'ची उद्योजकता विकास 'महिला स्पेशल' बॅच सुरू!!

स्त्री शक्तीच्या उद्योजकतेला मिळणार चालना!! मुख्य फोटो
स्त्री शक्तीच्या उद्योजकतेला मिळणार चालना!! अतिरिक्त फोटो

स्त्री शक्तीच्या उद्योजकतेला मिळणार चालना!!

छत्रपती संभाजीनगर (दि. ३ जून) - 'अमृत' मार्फत लघुउद्योजक निर्मिती तसेच उद्योजकता विकास व्हावा यासाठी 'अमृत उद्यम प्रशिक्षण कार्यक्रम' राबविला जातो. या कार्यक्रमाच्या माध्यमातून उद्योग करायला उत्सुक पण उद्योग कसा करावा, कोणता करावा? याबाबत अनभिज्ञ असलेल्या युवक, युवती आणि महिला यांच्याकरिता उद्यम प्रशिक्षण कार्यक्रम (EDP) राबविला जातो.

छ. संभाजीनगर येथे अमृतच्या पहिल्या 'महिला स्पेशल' बॅचचा शुभारंभ श्री. दीपक जोशी (राज्य समन्वयक, अमृत) यांच्या हस्ते, तसेच अमित सामंत (विभाग व्यवस्थापक, मराठवाडा), ओंकार शेटे (विभाग उपव्यवस्थापक, मराठवाडा), अक्षय लंबे (जिल्हा व्यवस्थापक, छ. संभाजीनगर), अमृत सखी मंजू कुलकर्णी, अमृत सखी रूचा शर्मा आणि अमृत मित्र रामेश्वर साळुंके यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.

पहिल्या दिवशी उद्योगाची निवड, व्हिजन-मिशन स्टेटमेंटची आवश्यकता, उद्योजकीय मानसिकता, नव्या युगासाठी उद्योजकांना आवश्यक गुण इत्यादी बाबतचे प्रशिक्षण अमित सामंत यांनी दिले. या इंटरऍक्टिव्ह सेशनमध्ये महिलांनी उत्स्फूर्तपणे भाग घेऊन अनेक शंकांचे निरसन करून घेतले. आपल्याकडे असणाऱ्या कौशल्याचे व्यवसायात रूपांतर कसे करावे, याबाबत भगिनी वर्गाची पूर्वतयारी होण्यात या सेशनचा खूप फायदा होईल, असे भगिनी वर्गाने आवर्जून सांगितले.

अमृत EDP कार्यक्रमाच्या माध्यमातून उद्योगाची निवड, आवश्यक शासकीय परवानग्या, बँक कर्ज, विविध शासकीय योजना, ब्रँडिंग, मार्केटिंग, सेल्स, सोशल मीडिया मार्केटिंग, निर्यात इत्यादींबाबत माहिती देऊन उद्योग सुरू करेपर्यंत पाठपुरावा केला जातो आणि त्यानंतर उद्योग सुरू राहावा यासाठी हँड होल्ड सपोर्ट दिला जातो.

Publisher: अमित सामंत News publisher name | Date: 04-06-2026 News publication date | Time: 02:11 PM News publication time | Views: 49 Number of times this news has been viewed | District: Chhatrapati_Sambhajinagar Related district of the news
Publisher: अमित सामंत News publisher name | Date: 04-06-2026 News publication date | Time: 02:11 PM News publication time | Views: 49 Number of times this news has been viewed | District: Chhatrapati_Sambhajinagar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 1 Comments

C
Chaitali Thakare
04-06-2026 06:23 PM

पण सहभागी कस व्हावं plz मला खूप गरज आहे मार्गदर्शनाची... माझा candle बनवायचा उद्योग आहे पण ऑर्डर मिळत नाहीयेत. आणि प्रमोशन साठी बजेट नाही....plz

Write a Comment
0 / 50 words
Advertisement