अमृत संस्थेच्या लाभार्थी कु. गौरी जोशी यांची लातूर येथील जिल्हा उद्योग केंद्रात नुकतीच रुजू झाली आहे.
लातूर, प्रतिनिधी : अमृत संस्थेच्या लाभार्थी कु. गौरी जोशी यांची लातूर येथील जिल्हा उद्योग केंद्रात निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करून गौरव करण्यात आला.
यावेळी अमृत संस्थेचे लातूर जिल्हा व्यवस्थापक शुभम मूळजकर तसेच एमसीईडी प्रकल्प अधिकारी दीपक गायकवाड यांच्या हस्ते गौरी जोशी यांचा सन्मान करण्यात आला. त्यांच्या या यशाबद्दल संस्थेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
गौरी जोशी यांनी आपल्या मेहनती, जिद्द आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. त्यांच्या निवडीमुळे अमृत संस्थेच्या लाभार्थ्यांसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण झाले असून संस्थेच्या कार्यासही एकप्रकारे गौरव प्राप्त झाला आहे.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी गौरी जोशी यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या तसेच समाजातील तरुणांनी शिक्षण व कौशल्य विकासाच्या माध्यमातून विविध क्षेत्रांत यश संपादन करावे, असे सांगितले. अमृत संस्थेतर्फे अशा प्रकारच्या योजनांचा अधिकाधिक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा आणि गौरीसारखेच यश संपादन करावे, असे आवाहन अमृत संस्थेतर्फे करण्यात आले आहे.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment