अमृत संस्थेची नागपूरच्या धनवटे नॅशनल कॉलेजला भेट

विद्यार्थ्यांना जनसंज्ञापन विभागात करिअरसाठी असलेल्या संधींबद्दल चर्चा

फोटो उपलब्ध नाहीत

या बातमीशी संबंधित कोणतेही फोटो उपलब्ध नाहीत

नागपूर : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या नागपूर विभागीय कार्यालयाच्या प्रतिनिधींनी नागपूर येथील धनवटे नॅशनल कॉलेजला भेट दिली. कॉलेजच्या मास कम्युनिकेशन (जनसंज्ञापन) विभागाचे प्रमुख नितीन कराळे यांच्याशी अमृत संस्थेची कार्यप्रणाली आणि उपक्रमांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

अमृत संस्थेचे नागपूर जिल्हा व्यवस्थापक हर्षल गद्रे, तसेच नागपूर जिल्हा उपव्यवस्थापिका सौ. वृषाली सवनकर यांनी अमृत संस्थेच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या विविध योजना, युवक व विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध प्रशिक्षण कार्यक्रम, कौशल्यविकास उपक्रम, तसेच स्वयंरोजगार व उद्योजकतेसाठी केले जाणारे मार्गदर्शन याबाबत सखोल माहिती या वेळी दिली.

विशेषतः मास कम्युनिकेशन विभागाशी संबंधित मीडिया, पत्रकारिता, डिजिटल कम्युनिकेशन, फिल्म मेकिंग, सोशल मीडिया व्यवस्थापन, कंटेंट क्रिएशन अशा विविध क्षेत्रांतील संधींवर विस्तृत चर्चा झाली. या क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रशिक्षण, प्रात्यक्षिक अनुभव, उद्योगाशी जोडणी, तसेच रोजगाराभिमुख कौशल्य विकसित करण्यासाठी अमृत व शैक्षणिक संस्थांमध्ये समन्वयाने काम करता येईल, यावर भर देण्यात आला.

धनवटे नॅशनल कॉलेजमधील विद्यार्थ्यांसाठी भविष्यात कार्यशाळा, प्रशिक्षण सत्रे, मार्गदर्शन शिबिरे तसेच संयुक्त उपक्रम राबवण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. अमृत संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना रोजगारक्षम बनविणे, त्यांच्यातील कौशल्यांचा विकास करणे आणि नव्या संधी उपलब्ध करून देणे हे संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे हर्षल गद्रे यांनी या वेळी स्पष्ट केले.

या भेटीद्वारे अमृत व धनवटे नॅशनल कॉलेज यांच्यातील सहकार्य अधिक बळकट होईल, तसेच मास कम्युनिकेशन क्षेत्रात विद्यार्थ्यांसाठी नवे उपक्रम सुरू होण्याचा मार्ग मोकळा होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.

अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/

Publisher: Harshal Gadre News publisher name | Date: 23-12-2025 News publication date | Time: 12:22 PM News publication time | Views: 62 Number of times this news has been viewed | District: nagpur Related district of the news
Publisher: Harshal Gadre News publisher name | Date: 23-12-2025 News publication date | Time: 12:22 PM News publication time | Views: 62 Number of times this news has been viewed | District: nagpur Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words