महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्था महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (AMRUT) यांच्या वतीने दि. ५ व ६ जून २०२६ रोजी शेतकरी भवन, मंगळवार बाजार, हिंगोली येथे “अमृतपेठ – थेट बाजारपेठ” या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या बाजारपेठेत महिला बचत गट, स्थानिक उद्योजक व उत्पादक यांच्या विविध खाद्यपदार्थ, हस्तकला, वस्त्र, आरोग्य व सौंदर्यविषयक उत्पादनांचे स्टॉल उपलब्ध राहणार आहेत. तसेच नेत्र तपासणी, आरोग्य तपासणी, सोलर पॅनल व विविध शासकीय योजनांची माहिती व ऑनलाईन नोंदणीसाठी विशेष स्टॉलची व्यवस्था करण्यात आली आहे.
विविध प्रकारचे खाद्यपदार्थ, गृहउद्योग उत्पादने, महिला व हस्तकला वस्तू, वस्त्रप्रकार, आरोग्य व सौंदर्य उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध राहणार आहेत. यामध्ये नाचणी लाडू, शेंगदाणा लाडू, चकली, बाकरवडी, लोणचे, मसाले, बटाटा पापड, नागली पापड, शेव, गव्हाचे खाकरा, थालपीठ, ढोकळा व आईस प्रीमिक्स यांसारख्या खाद्यपदार्थ तुम्हाला एकाच छताखाली हवे आहेत,मग ही सुवर्णसंधी उपलब्ध करून देत आहे अमृत! तसेच मोती ज्वेलरी, अमेरिकन डायमंड दागिने, हॅन्डमेड नथ, हॅन्डमेड मॅट, रांगोळी, माहेश्वरी व रेग्युलर साड्या, कुर्तीज, जेन्ट्स ड्रेसेस, बॅग, साडी कव्हर, ब्लाऊज तसेच खणापासून तयार केलेल्या विविध वस्तू नागरिकांसाठी उपलब्ध राहणार आहेत. आरोग्य व सौंदर्य विभागामध्ये आयुर्वेदिक साबण, फेसवॉश, स्किन व हेअर केअर उत्पादने, परफ्यूम, अगरबत्ती आदी उत्पादनांचे स्टॉल असतील. याशिवाय सोलर पॅनल, वॉटरप्रूफिंग, आर्ट अँड क्राफ्ट, नेत्र तपासणी, आरोग्य तपासणी तसेच देवगड हापूस, पायरी व विविध प्रकारच्या आंब्यांचे विशेष स्टॉलही आकर्षणाचे केंद्र ठरणार आहेत.महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्था महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (AMRUT) यांच्या वतीने दि. ५ व ६ जून २०२६ रोजी शेतकरी भवन, मंगळवार बाजार, हिंगोली येथे “अमृतपेठ – थेट बाजारपेठ” या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या दोन्ही दिवशी सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत चालणाऱ्या या उपक्रमामध्ये नागरिकांना थेट उत्पादकांकडून दर्जेदार उत्पादने खरेदी करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. स्थानिक उत्पादक, महिला बचत गट, ग्रामीण उद्योजक आणि स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. ग्राहक आणि उत्पादक यांच्यातील थेट दुवा निर्माण करून स्थानिक उत्पादनांना व्यापक बाजारपेठ उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. अहिल्यानगर येथे आयोजित अमृतपेठला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर आता हिंगोलीमध्येही ही विशेष बाजारपेठ भरविण्यात येत आहे. या उपक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे विविध शासकीय योजनांची माहिती व ऑनलाईन नोंदणीसाठी विशेष मार्गदर्शन केंद्र उपलब्ध राहणार आहे. त्यामुळे नागरिकांना शासनाच्या विविध योजनांची माहिती एकाच ठिकाणी मिळणार असून त्यांना आवश्यक मार्गदर्शनही करण्यात येणार आहे. तेव्हा हिंगोलीकरांनो ही संधी चुकवू नका. अमृतपेठ- थेट बाजारपेठच्या या उपक्रमास भरभरून प्रतिसाद द्या.
संपर्क : अमृत जिल्हा कार्यालय, हिंगोली मो. क्र. : 7391065471
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment