वाशिम जिल्ह्यातील कामरगावमधील बैठकीत देण्यात आली अमृत संस्थेच्या योजनांची माहिती

ब्राह्मण आणि मारवाडी समाजाने योजनांबद्दल व्यक्त केली उत्सुकता

फोटो उपलब्ध नाहीत

या बातमीशी संबंधित कोणतेही फोटो उपलब्ध नाहीत

कामरगाव (ता. कारंजा, जि. वाशिम) : खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्यरत असलेल्या अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेमार्फत विविध कल्याणकारी योजना राबवण्यात येतात. या योजनांची माहिती समाजातील जास्तीत जास्त घटकांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने वाशिम जिल्ह्याच्या कारंजा तालुक्यातील कामरगाव येथे मारवाडी समाज व ब्राह्मण समाजाच्या संयुक्त उपस्थितीत समाजप्रबोधन बैठक आयोजित करण्यात आली होती.

अमृत संस्थेचे वाशिम जिल्हा उपव्यवस्थापक रोहित देशमुख यांनी या बैठकीत मार्गदर्शन केले. या बैठकीला चंद्रकांत जोशी व्यास महाराज, अभय मिश्रा, पवन मिश्रा यांच्यासह माहेश्वरी समाज व ब्राह्मण समाजातील अनेक मान्यवर आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. रोहित देशमुख यांनी अमृत संस्थेतर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, त्यांची उद्दिष्टे, लाभार्थ्यांची पात्रता, अर्जप्रक्रिया, तसेच या योजनांचे युवक, महिला व सामान्य नागरिकांना होणारे फायदे याबाबत सविस्तर व सोप्या शब्दांत माहिती दिली. उपस्थित समाजबांधवांनी योजनांबाबत उत्सुकता दाखवून सकारात्मक प्रतिसाद दिला.

अशा प्रकारच्या संवाद बैठकांमुळे शासनाच्या योजना समाजापर्यंत पोहोचत असून, समाजातील प्रत्येक घटकाच्या सर्वांगीण विकासासाठी अमृत संस्था सातत्याने कार्यरत असल्याचे या वेळी नमूद करण्यात आले.

अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.

अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/

Publisher: Yogesh Joshi News publisher name | Date: 23-12-2025 News publication date | Time: 11:50 AM News publication time | Views: 158 Number of times this news has been viewed | District: washim Related district of the news
Publisher: Yogesh Joshi News publisher name | Date: 23-12-2025 News publication date | Time: 11:50 AM News publication time | Views: 158 Number of times this news has been viewed | District: washim Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words