लवकरात लवकर नावनोंदणीचे आवाहन
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थता अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे जालना जिल्ह्यातील युवक, महिला तसेच इच्छुक उद्योजकांसाठी मोफत उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम (ईडीपी) आयोजित करण्यात आला आहे. स्वयंरोजगार आणि उद्योग उभारणीसाठी इच्छुक असलेल्या नागरिकांसाठी ही सुवर्णसंधी आहे.
या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये उद्योजकता विकास, व्यवसाय नियोजन, उद्योग व्यवस्थापन, स्वयंरोजगाराच्या संधी, शासकीय योजनांची माहिती, आर्थिक व्यवस्थापन, तसेच कौशल्यविकास या संदर्भात तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. प्रशिक्षण पूर्णपणे मोफत असून, सहभागी उमेदवारांना उद्योग क्षेत्रातील विविध संधींबाबत सविस्तर माहिती दिली जाणार आहे.
जिल्ह्यातील बेरोजगार युवक-युवती, महिला बचत गट सदस्य, नवउद्योजक आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या व्यक्तींनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन अमृत संस्थेतर्फे करण्यात आले आहे. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी खालील क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आवश्यक कागदपत्रे : आधार कार्ड, पॅन कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, उत्पन्न दाखला, डोमिसाइल प्रमाणपत्र .
संपर्क :
नितीन खेकाळे - 7391065474, 9130283058
जालना जिल्हा व्यवस्थापक, अमृत
चिंतेश जोशी - 9421944752
जालना जिल्हा उपव्यवस्थापक, अमृत
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा २५ जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment