दोन जूनपर्यंत नावनोंदणी
फलटण : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे फलटण (जि. सातारा) युवक, महिला व इच्छुक उद्योजकांसाठी उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम (ईडीपी) सुरू करण्यात येत आहे. हा कार्यक्रम पूर्णपणे मोफत असून, आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया दोन जूनपर्यंत सुरू राहणार आहे.
उद्योजकता विकास, व्यवसाय नियोजन, स्वयंरोजगार संधी, उद्योग मार्गदर्शन व कौशल्य विकासासाठी हा कोर्स अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. कोर्ससाठी मर्यादित जागा असून, इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर नोंदणी करून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
आवश्यक कागदपत्रे :
शाळा सोडल्याचा दाखला, उत्पन्न दाखला, डोमिसाइल प्रमाणपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड
संपर्क : अविनाश कुलकर्णी - 7841952681
सातारा जिल्हा उपव्यवस्थापक, अमृत
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा २५ जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment