सावरकरांना जयंतीदिनी अमृत संस्थेच्या छत्रपती संभाजीनगर कार्यालयात अभिवादन

सावरकरांच्या कार्याचे करण्यात आले स्मरण

सावरकरांना जयंतीदिनी अमृत संस्थेच्या छत्रपती संभाजीनगर कार्यालयात अभिवादन मुख्य फोटो
सावरकरांना जयंतीदिनी अमृत संस्थेच्या छत्रपती संभाजीनगर कार्यालयात अभिवादन अतिरिक्त फोटो

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या छत्रपती संभाजीनगर विभागीय आणि जिल्हा कार्यालयात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना त्यांच्या १४३व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. या वेळी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्याला उजाळा देण्यात आला.

२८ मे १८८३ रोजी नाशिक जिल्ह्यातील भगूर येथे जन्मलेल्या सावरकरांचे भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वपूर्ण योगदान आहे. अभिनव भारत या क्रांतिकारी संघटनेची स्थापना, १८५७चे स्वातंत्र्यसमर या ऐतिहासिक ग्रंथाचे लेखन, तसेच अंदमानातील सेल्युलर जेलमध्ये भोगलेली कठोर शिक्षा यामुळे त्यांचे कार्य विशेष स्मरणीय ठरते. समाजातील अस्पृश्यता निर्मूलन, राष्ट्रभक्ती, स्वाभिमान आणि विज्ञाननिष्ठ विचारांचा प्रसार करण्यासाठी त्यांनी मोठे कार्य केले. त्यांच्या या कार्याला या कार्यक्रमात उजाळा देण्यात आला.

या कार्यक्रमाला अमृत संस्थेचे राज्य व्यवस्थापक दीपक जोशी, विशाल दरगड, आदित्य धाराशिवकर, राजेश मेहता, भरत कापरे, विजय कुलकर्णी, समीर कुलकर्णी, अनिल कुलकर्णी, श्रीमती विजया कुलकर्णी व विनया कुलकर्णी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक अक्षय लंबे, अमृतसखी मंजू कुलकर्णी आणि अमृतमित्र रामेश्वर साळुंखे यांनी केले.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा २५ जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/


Publisher: Akshay lambe News publisher name | Date: 28-05-2026 News publication date | Time: 02:02 PM News publication time | Views: 1,877 Number of times this news has been viewed | District: Chhatrapati_Sambhajinagar Related district of the news
Publisher: Akshay lambe News publisher name | Date: 28-05-2026 News publication date | Time: 02:02 PM News publication time | Views: 1,877 Number of times this news has been viewed | District: Chhatrapati_Sambhajinagar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 1 Comments

B
Balraj Dontul
29-05-2026 07:44 AM

मला या संस्थे बद्दल माहिती हवी आहे, त्याचा एक कार्यालय उघडण्याच्या दृष्टीने
लोकांना या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी.....
मी बालराज दोंतुल, समाज सेवक
378, सुनिल नगर, सोलापूर.
9637130526

Write a Comment
0 / 50 words
Advertisement