पृथ्वीराज कायरकर यांचा अमृत संस्थेच्या चंद्रपूर कार्यालयात सत्कार

अमृत संस्थेच्या कार्यातील सेवेचा प्रेरणादायी चेहरा

पृथ्वीराज कायरकर यांचा अमृत संस्थेच्या चंद्रपूर कार्यालयात सत्कार मुख्य फोटो
मुख्य फोटो

चंद्रपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे चंद्रपूर जिल्हा महाविद्यालयीन प्रमुख पृथ्वीराज कायरकर याचा अमृत संस्थेच्या चंद्रपूर कार्यालयात सत्कार करण्यात आला. त्यांनी वेळोवेळी अमृत संस्थेच्या कार्यात मोलाचे सहकार्य केले आहे. त्याची दखल घेऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

सामाजिक बांधिलकी, कार्याप्रति असलेली निष्ठा आणि स्वयंसेवेची जाणीव यामुळे कायरकर यांनी अमृत परिवारात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अमृतपेठ उपक्रम आयोजनात त्यांचा सिंहाचा वाटा होता. नियोजनापासून प्रत्यक्ष अंमलबजावणीपर्यंत त्यांनी सातत्याने सहभाग घेऊन कार्याला बळ दिले. त्यांच्या सहकार्यामुळे अनेक उपक्रम अधिक प्रभावीपणे राबवणे शक्य झाले. कोणत्याही प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता समाजहितासाठी कार्य करण्याची त्यांची वृत्ती सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. म्हणूनच त्यांचा सत्कार करण्यात आला. सत्कारावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्याचा गौरव करून अमृत संस्थेसाठी त्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले.

खऱ्या अर्थाने स्वयंसेवी पद्धतीने समाजकार्यात सहभागी होणारे आणि प्रत्येक कार्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारे पृथ्वीराज कायरकर हे अमृतमित्र या संकल्पनेचे आदर्श उदाहरण असून, त्यांचे कार्य आणि सहकार्य भविष्यातही अनेक कार्यकर्त्यांना प्रेरणा देत राहील, यात शंका नाही, अशी भावना या वेळी व्यक्त करण्यात आली.

अधिक माहितीसाठी संपर्क :

विक्रम मोहन पांडे - 9112228774

चंद्रपूर जिल्हा व्यवस्थापक, अमृत 

पत्ता : गुरुद्वारा रोड, कृष्णा टॉवरजवळ, तुकूम, चंद्रपूर - 442402

ई-मेल : amrut.chandrapur.dm@gmail.com

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा २५ जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/


Publisher: विक्रम मोहन पांडे News publisher name | Date: 23-05-2026 News publication date | Time: 05:00 PM News publication time | Views: 637 Number of times this news has been viewed | District: Chandrapur Related district of the news
Publisher: विक्रम मोहन पांडे News publisher name | Date: 23-05-2026 News publication date | Time: 05:00 PM News publication time | Views: 637 Number of times this news has been viewed | District: Chandrapur Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement