बिलोलीचे तहसीलदार गजानन शिंदे यांनी केली अमृत संस्थेच्या कार्याची प्रशंसा

आवश्यक त्या मदतीची दिली ग्वाही

बिलोलीचे तहसीलदार गजानन शिंदे यांनी केली अमृत संस्थेच्या कार्याची प्रशंसा मुख्य फोटो
बिलोलीचे तहसीलदार गजानन शिंदे यांनी केली अमृत संस्थेच्या कार्याची प्रशंसा अतिरिक्त फोटो

नांदेड : अमृत परिवार सर्वेक्षणावेळी नांदेड जिल्ह्यातील बिलोली आणि परिसरातील प्रवासावेळी अमृत संस्थेचे नांदेड जिल्हा उपव्यवस्थापक विश्वेश्वर जोशी यांनी बिलोलीचे तहसीलदार गजानन शिंदे यांची भेट घेतली. त्यांना अमृत संस्थेच्या सगळ्या कार्याबद्दल, योजनांबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली. शिंदे यांनी अमृत संस्थेच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले. या संदर्भातील कामांकरिता लागणारी मदत देण्याची ग्वाही दिली आणि अमृत संस्थेच्या कार्याला शुभेच्छा दिल्या.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा २५ जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/


Publisher: विश्वेश्वर वासुदेवराव जोशी News publisher name | Date: 23-05-2026 News publication date | Time: 11:56 AM News publication time | Views: 206 Number of times this news has been viewed | District: Nanded Related district of the news
Publisher: विश्वेश्वर वासुदेवराव जोशी News publisher name | Date: 23-05-2026 News publication date | Time: 11:56 AM News publication time | Views: 206 Number of times this news has been viewed | District: Nanded Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement