हिंगोली : खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्यरत असलेली अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी) यांच्या संयुक्त विद्यमाने फॅशन डिझायनिंग व ड्रेस मेकिंग या विषयावरील मोफत प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ आज, २२ डिसेंबर २०२५ रोजी होत आहे.
हिंगोली : खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्यरत असलेली अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी) यांच्या संयुक्त विद्यमाने फॅशन डिझायनिंग व ड्रेस मेकिंग या विषयावरील मोफत प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ आज, २२ डिसेंबर २०२५ रोजी होत आहे. या कार्यक्रमात फॅशन डिझायनिंग क्षेत्रातील रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी, उद्योजकीय कौशल्य विकास, बाजारपेठ व्यवस्थापन तसेच शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन करण्यात येणार असून, या उपक्रमामुळे युवक व महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाला चालना मिळणार आहे.
या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक अमृत संस्थेचे राज्य व्यवस्थापक दीपक जोशी उपस्थित राहणार असून, एमसीईडीचे राज्य समन्वयक श्रीकांत कुलकर्णी, एमसीईडीचे विभागीय अधिकारी सुधाम थोटे हेदेखील उपस्थित राहणार आहेत. २० जानेवारी २०२६पर्यंत हे प्रशिक्षण सुरू राहणार आहे. हिंगोलीतील आनंदनगर येथील जिजाऊ बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेत हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.
फॅशन डिझायनिंग व ड्रेस मेकिंग क्षेत्रातील रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी, उद्योजकीय कौशल्य विकास, बाजारपेठ व्यवस्थापन, अमृत योजनांतर्गत कर्जविषयक मार्गदर्शन, तसेच विविध शासकीय योजनांची माहिती या प्रशिक्षणात देण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे जिल्ह्यातील युवक व महिलांना आर्थिक स्वावलंबनाच्या दिशेने नवे दालन खुले होणार आहे.
अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.
अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment