कौशल्य प्रशिक्षण घ्या आणि उद्योजक व्हा!

राज्यातील युवक-युवतींसाठी शासनाच्या विशेष योजना

कौशल्य प्रशिक्षण घ्या आणि उद्योजक व्हा! मुख्य फोटो
मुख्य फोटो

राज्यातील युवक-युवतींना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, त्यांचे सर्वांगीण सक्षमीकरण व्हावे, यासाठी राज्याच्या कौशल्य विकास व उद्योजकता विभागामार्फत विविध उपक्रम राबवले जातात. या उपक्रमांतर्गत प्रशिक्षण पूर्णपणे मोफत दिले जाते आणि १५ ते ४५ वर्षे वयोगटातील उमेदवारांना यात सहभागी होण्याची संधी उपलब्ध आहे. यातील काही योजना अशा -

प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान :

कौशल्य विकास व उद्योजकता विभाग राज्यातील युवक-युवतींचे कौशल्य विकासाद्वारे सक्षमीकरण करून मागणी असलेल्या उद्योग सेवा व तत्सम क्षेत्रात त्यांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी काम करत आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या स्थानिक गरजांनुसार विशिष्ट मागणीच्या अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण दिले जाते. त्या प्रशिक्षणांकरिता शैक्षणिक अर्हता प्रत्येक अभ्यासक्रमानुसार वेगवेगळी असू शकते.

दहावी उत्तीर्ण/अनुत्तीर्ण ते पदवीपर्यंतच्या उमेदवारांना कौशल्य प्रशिक्षणाचा लाभ घेता येऊ शकतो.

हे प्रशिक्षण कोर्सेस तीन ते सहा महिने कालावधीचे असतात.

विविध कोर्सचे कौशल्य प्रशिक्षण जिल्ह्यामध्ये कोठे उपलब्ध होऊ शकेल याची माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान राज्य स्तरावर आणि किमान कौशल्य विकास कार्यक्रम जिल्हा स्तरावर राबवला जातो.

प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास कार्यक्रम :

ग्रामीण भागातून शहराकडे होणाऱ्या स्थलांतराचे प्रमाण कमी करण्यासाठी, ग्रामीण भागात रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात, यासाठी ग्रामीण कौशल्य विकास केंद्राची स्थापना करण्यात आली आहे.

आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र :

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना महाविद्यालयामध्येच कौशल्य विकास प्रशिक्षण उपलब्ध व्हावे, याकरिता महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. महाविद्यालयीन शिक्षण घेऊन बाहेर पडताना विद्यार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षण घेता यावे यासाठी आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे.

योजनांची वैशिष्ट्ये

- सर्व उमेदवारांना मोफत कौशल्य प्रशिक्षण.

- १५ ते ४५ वयोगटातील पात्र उमेदवारांना प्रशिक्षणाची संधी.

- कोर्स पूर्ण झाल्यानंतर रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधींमध्ये लक्षणीय वाढ.

अधिक माहितीसाठी संकेतस्थळे :

१. https://www.mahaswayam.gov.in/

२. https://kaushalya.mahaswayam.gov.in/

(निवडक शासकीय योजनांची माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)


Publisher: Aniket Konkar News publisher name | Date: 05-05-2026 News publication date | Time: 07:09 PM News publication time | Views: 1,196 Number of times this news has been viewed | District: Ratnagiri Related district of the news
Publisher: Aniket Konkar News publisher name | Date: 05-05-2026 News publication date | Time: 07:09 PM News publication time | Views: 1,196 Number of times this news has been viewed | District: Ratnagiri Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement