सर्वार्थाने लाभदायी असलेल्या प्रधानमंत्री सूर्यघर योजनेचा करून घ्या उपयोग
पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना नैसर्गिक साधनसंपत्ती जपून वापरण्याचे आवाहन केले आहे. वीज आणि इंधनबचतीसाठी सौरऊर्जेसारख्या अपारंपरिक ऊर्जेचा वापर वाढवण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. या पार्श्वभूमीवर, पीएम सूर्यघर योजनेचा लाभ करून घेतल्यास ग्राहकांना स्वतःची वीज स्वतः तयार करता येईल, अतिरिक्त वीजनिर्मिती झाल्यास त्यातून पैसे मिळतील, इंडक्शन स्टोव्हसारखी साधने वापरल्यास स्वयंपाकाच्या गॅस वापरात थोडी कपात होऊ शकेल आणि इलेक्ट्रिक वाहनांचा वापर केल्यास ती वाहनेदेखील या ऊर्जेवर चार्ज करता येतील. एकंदरीतच ही योजना वैयक्तिक बचतीसाठी, नैसर्गिक साधनसंपत्ती वाचवण्यासाठी आणि प्रदूषण कमी करण्यासाठी अशा सर्वार्थाने लाभदायी ठरू शकते. या योजनेविषयी थोडक्यात जाणून घेऊ या.
घरगुती ग्राहकांना स्वतःची वीज निर्माण करता यावी आणि छतावरील सौरऊर्जानिर्मितीला चालना मिळावी या उद्देशाने केंद्र सरकारने प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना सुरू केली. २९ फेब्रुवारी २०२४ रोजी त्या योजनेला मंजुरी मिळाली.
योजनेची प्रमुख उद्दिष्टे
महत्त्वाचे लाभ
अनुदान
घरगुती सौरऊर्जा प्रणालीसाठी अनुदान दिले जाते. एक किलोवॅटच्या प्रकल्पाला ३० हजार रुपये, दोन किलोवॅटच्या प्रकल्पाला ६० हजार रुपये, तर तीन किलोवॅट किंवा अधिक क्षमतेच्या प्रकल्पाला जास्तीत जास्त ७८ हजार रुपये एवढे अनुदान दिले जाते.
कोणाला लाभ घेता येईल?
घरगुती वीज ग्राहक आणि स्वतःच्या घराच्या छतावर सौरऊर्जा प्रकल्प बसवू इच्छिणारे नागरिक या योजनेचा लाभ घेऊ इच्छितात.
महाराष्ट्रातील अंमलबजावणी
महाराष्ट्रात या योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात काम सुरू असून आतापर्यंत सुमारे १.२५ लाखहून अधिक घरांनी त्याचा लाभ घेतला आहे. लाभार्थ्यांना सुमारे ८०० कोटी रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. योजनेसाठी पेपरलेस आणि फेसलेस व्यवस्था विकसित करण्यात आली आहे.
अर्जप्रक्रिया
योजनेसाठी अर्ज राष्ट्रीय पोर्टलद्वारे ऑनलाइन करता येतो. अर्जदारांना पोर्टलवरून मान्यताप्राप्त विक्रेता निवडण्याची सुविधा उपलब्ध आहे.
अर्ज करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ : https://pmsuryaghar.gov.in/#/
कर्जसुविधेचे पर्याय
सौरऊर्जा प्रणाली बसवण्यासाठी ग्राहकांना आर्थिक मदत मिळावी याकरिता विविध बँकांकडून सुलभ कर्जपर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. प्रधानमंत्री सूर्यघर पोर्टलवर “Consumer Financing Options” विभागामध्ये विविध वित्तपुरवठा पर्यायांची माहिती उपलब्ध आहे.
कर्जसुविधेची वैशिष्ट्ये
एकंदरीतच, प्रधानमंत्री सूर्यघर योजना ही वीजबिलात बचत, स्वच्छ ऊर्जा आणि ऊर्जा स्वावलंबन या तिन्ही गोष्टी साध्य करणारी महत्त्वाची योजना ठरत आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील घरगुती ग्राहकांसाठी ही योजना आर्थिकदृष्ट्या लाभदायक ठरत असून, सौरऊर्जेच्या वापराला नवी दिशा देत आहे.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment