अहिल्यानगरमध्ये पुन्हा भरणार अमृतपेठ थेट बाजारपेठ; स्टॉल बुकिंग सुरू

२३ आणि २४ मे रोजी आयोजन; लघुउद्योजकांनी संपर्क साधण्याचे आवाहन

अहिल्यानगरमध्ये पुन्हा भरणार अमृतपेठ थेट बाजारपेठ; स्टॉल बुकिंग सुरू मुख्य फोटो
मुख्य फोटो

अहिल्यानगर : स्थानिक उत्पादकांनी तयार केलेल्या दर्जेदार उत्पादनांच्या विक्रीला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे 'अमृतपेठ - थेट बाजारपेठ' हा विशेष उपक्रम राबवला जातो. अहिल्यानगरमध्ये मार्च महिन्यात भरलेल्या अमृतपेठ थेट बाजारपेठेला चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे आता पुन्हा एकदा त्या उपक्रमाचे आयोजन अहिल्यानगरमध्ये करण्यात आले असून, २३ आणि २४ मे २०२६ रोजी ही अमृतपेठ भरणार आहे. अमृत संस्था आणि अहिल्यानगरमधील बीबीएन वेल्फेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. स्वदेशी आणि दर्जेदार उत्पादने हे अमृतपेठेचे वैशिष्ट्य असून, ग्राहक आणि उत्पादक अशा दोघांसाठीही हा उपक्रम फायद्याचा ठरतो.

लघु उद्योजकांना आपली उत्पादने सादर करण्यासाठी अमृतपेठ हे एक उत्तम व्यासपीठ असून, पुढील प्रकारची उत्पादने असलेल्या उद्योजकांनी आपला स्टॉल बुक करण्यासाठी संपर्क साधावा, असे आवाहन अमृत संस्थेचे अहिल्यानगर जिल्हा व्यवस्थापक सागर भोपे यांनी केले आहे.

- साड्यांचे प्रकार व कपडे

- हँडमेड वस्तू 

घरगुती पदार्थ (मसाले, पापड, फूड पॅकेट्स)

- कलात्मक वस्तू

- ज्वेलरी, बॅग 

- पूजासाहित्य 

- लहान मुलांच्या वस्तू 

- स्वादिष्ट खाद्यपदार्थ

- विविध प्रकारचे आंबे (हापूस, पायरी, केशर, इत्यादी)

- इन्शुरन्स आणि सोलर उत्पादने

या व्यतिरिक्त सर्व शासकीय योजनांची माहिती देणारा आणि नोंदणी करून घेणारा स्टॉलही अमृतपेठमध्ये असेल.


अमृतपेठ थेट बाजारपेठ

दिनांक : २३ आणि २४ मे २०२६

वेळ : सकाळी नऊ ते रात्री नऊ

स्थळ : ऋग्वेद भवन हॉल, चितळे रोड, अहिल्यानगर 

अधिक माहिती आणि स्टॉल बुकिंगसाठी संपर्क :

सागर भोपे : 9766622274

अमृत जिल्हा कार्यालय : 9112228769

जिल्हा कार्यालय पत्ता : वरुण अपार्टमेंट, आकाशवाणीसमोर, 

प्रोफेसर चौक, सावेडी, अहिल्यानगर - 414003

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा २५ जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/


Publisher: Sagar Bhope News publisher name | Date: 29-04-2026 News publication date | Time: 05:13 PM News publication time | Views: 1,229 Number of times this news has been viewed | District: Ahilyanagar Related district of the news
Publisher: Sagar Bhope News publisher name | Date: 29-04-2026 News publication date | Time: 05:13 PM News publication time | Views: 1,229 Number of times this news has been viewed | District: Ahilyanagar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement