ठाणे जिल्ह्यात अमृत परिवार सर्वेक्षणासाठी मिळतेय मान्यवरांचे सहकार्य

अधिकाधिक माहिती गोळा करण्यासाठी होणार उपयोग

ठाणे जिल्ह्यात अमृत परिवार सर्वेक्षणासाठी मिळतेय मान्यवरांचे सहकार्य मुख्य फोटो
ठाणे जिल्ह्यात अमृत परिवार सर्वेक्षणासाठी मिळतेय मान्यवरांचे सहकार्य अतिरिक्त फोटो

ठाणे : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे अमृत परिवार सर्वेक्षण अभियान राबवले जात आहे. ठाणे जिल्ह्यातही ते सुरू असून, अमृत संस्थेच्या ठाणे जिल्हा उपव्यवस्थापक माया रत्नपारखी-खेत्रे या संदर्भात विविध व्यक्तींची भेट घेत आहेत. नुकतीच त्यांनी ब्राह्मण ब्रिज नेटवर्क असोसिएशन अर्थात बीबीएनएचे पदाधिकारी जितेंद्र बजाज आणि श्रीकांत कुलकर्णी यांची भेट घेतली. त्या दोघांनाही अमृत संस्थेच्या कार्याबद्दल, तसेच अमृत परिवार सर्वेक्षणाबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली. स्थानिक पातळीवर सर्वेक्षण आणि इतर योजनांकरिता सहकार्य करण्याची सकारात्मक भूमिका त्या दोघांनीही व्यक्त केली. 

जितेंद्र बजाज हे माजिवडा-ठाणे येथील कला सुगंध मंडळ संचालित नवजीवन प्राथमिक विद्यामंदिर अर्थात वंचित मुलांच्या शाळेचे संचालक आहेत. तसेच, श्रीकांत कुलकर्णी हे ठाणे पोलीस आयुक्तालयातून पोलीस उपनिरीक्षक या पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. या दोन्ही मान्यवरांच्या सहकार्याचा अमृत संस्थेला चांगला उपयोग होणार आहे. अमृत ही संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. संस्थेच्या योजना लक्ष्यित गटातील जास्तीत जास्त कुटुंबापर्यंत पोहोचाव्यात आणि लोकांच्या गरजेनुसार नव्या योजना तयार करता याव्यात, यासाठी अमृत संस्थेकडून संपूर्ण महाराष्ट्रातील लक्ष्यित गटातील कुटुंबांचे सर्वेक्षण केले जात आहे. 

अधिक माहितीसाठी संपर्क :

माया रत्नपारखी-खेत्रे - 91122 26533

ठाणे जिल्हा उपव्यवस्थापक, अमृत

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा २५ जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/


Publisher: माया रत्नपारखी -खेत्रे News publisher name | Date: 24-04-2026 News publication date | Time: 01:52 PM News publication time | Views: 369 Number of times this news has been viewed | District: Thane Related district of the news
Publisher: माया रत्नपारखी -खेत्रे News publisher name | Date: 24-04-2026 News publication date | Time: 01:52 PM News publication time | Views: 369 Number of times this news has been viewed | District: Thane Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement