यवतमाळमध्ये अमृतपेठ थेट बाजारपेठेला उत्तम प्रतिसाद

परशुराम जन्मोत्सवानिमित्त अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने आयोजित विविधांगी कार्यक्रमांमध्येही नागरिकांचा सहभाग

यवतमाळमध्ये अमृतपेठ थेट बाजारपेठेला उत्तम प्रतिसाद मुख्य फोटो
यवतमाळमध्ये अमृतपेठ थेट बाजारपेठेला उत्तम प्रतिसाद अतिरिक्त फोटो

यवतमाळ : परशुराम जन्मोत्सवाचे औचित्य साधून अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे अमृतपेठ थेट बाजारपेठेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच, या निमित्ताने अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने विविधांगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

पहिल्या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. विनय कुलकर्णी उपस्थित होते. युवा ब्राह्मण संघ सदस्य व महिला मंडळ यांच्या वतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. यामध्ये पारंपरिक नृत्य, गायन, मिमिक्री, स्टँडअप कॉमेडी आणि विविध कलाप्रकारांचा समावेश होता. तसेच ५ ते ११ वर्षे वयोगटातील मुलांसाठी वेशभूषा स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते.

दुसऱ्या दिवशी सकाळी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी, आयुष्मान भारत कार्ड व वयवंदन योजनांसाठी कागदपत्रे तयार करून देण्यात आली. सकाळी १०.३० ते दुपारी एक या वेळेत पार पडलेल्या या शिबिरात मुंबई येथील सुप्रसिद्ध ॲक्युपंक्चर व कपिंग थेरपी तज्ज्ञ डॉ. पायल सर्वय्या, नॅचरोपॅथी व ॲक्युप्रेशर तज्ज्ञ डॉ. सुनील कोहारे, तसेच डॉ. प्रसाद बनसोड यांनी सेवा दिली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बुलढाणा अर्बनच्या विभागीय अधिकारी सौ. मुग्धा देशपांडे होत्या.

सायंकाळी पाच वाजता रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर सायंकाळी साडेसहा वाजता प्रबोधनात्मक कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमासाठी नाशिक येथील बीबीएनजी संस्थेचे संस्थापक श्रीपाद कुलकर्णी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी, तर प्रमुख अतिथी म्हणून नगर परिषद उपाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी उपस्थित होते.

यासोबतच या दोन्ही दिवशी सायंकाळी पाच ते रात्री १० या वेळेत अमृतपेठ थेट बाजारपेठेचे' आयोजन करण्यात आले होते. या बाजारपेठेत नागरिकांनी मोठ्या प्रमाणात खरेदी करून उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. विशेषतः ब्राह्मण समाजातील नागरिकांचा मोठ्या संख्येने सहभाग दिसून आला. हे सर्व कार्यक्रम शिवाजीनगरमधील विवेकानंद शाळेत आयोजित करण्यात आले होते. एकूणच, या कार्यक्रमांमुळे सामाजिक, सांस्कृतिक व आरोग्यविषयक जनजागृती साध्य झाली असल्याची भावना आयोजकांनी व्यक्त केली.

अधिक माहितीसाठी संपर्क :

परीक्षित कमलकिशोर शर्मा - ९११२२२७६३३, ८०८७२४८६७४

यवतमाळ जिल्हा व्यवस्थापक, अमृत

जिल्हा कार्यालय पत्ता : 

स्वामी समर्थ विहार, पहिला माळा, 

फ्लॅट क्रमांक ए-१, 

अवधूतवाडी, तिवारी चौक, 

यवतमाळ - ४४५ ००१  

ई-मेल : amrut.yavatmal.dm@gmail.com

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा २५ जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/



Publisher: Parikshit Sharma News publisher name | Date: 24-04-2026 News publication date | Time: 12:13 PM News publication time | Views: 845 Number of times this news has been viewed | District: Yavatmal Related district of the news
Publisher: Parikshit Sharma News publisher name | Date: 24-04-2026 News publication date | Time: 12:13 PM News publication time | Views: 845 Number of times this news has been viewed | District: Yavatmal Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement