समाजात नैतिक मूल्ये व संस्कार जपण्याचा संकल्प व्यक्त
धुळे : भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या धुळे जिल्हा कार्यालयातर्फे भगवान परशुराम यांच्या प्रतिमेला व भगवान परशुराम यांच्या निर्गुण पादुकांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी उपस्थितांनी भगवान परशुराम यांचे शौर्य, तपस्या व धर्मरक्षणाच्या कार्याचा गौरव करून त्यांच्या विचारांचे स्मरण केले.
कार्यक्रमात मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकत्र येऊन समाजात नैतिक मूल्ये व संस्कार जपण्याचा संकल्प व्यक्त केला. भगवान परशुराम यांच्या आदर्शांवर चालून समाजहिताचे कार्य अधिक प्रभावीपणे राबवण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. या वेळी अमृत संस्थेचे धुळे जिल्हा व्यवस्थापक हेमंत पाठक, अमृतमित्र विलास चंद्रात्रे यांचा श्री भगवान परशुराम चौक समितीद्वारे सामाजिक कार्यासाठी सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
अधिक माहितीसाठी संपर्क :
अमृत संस्थेचे धुळे जिल्हा कार्यालय,
२६, महाराणा प्रताप कॉलनी,
जुन्या चिरंतन हॉस्पिटलजवळ, देवपूर, धुळे
संपर्क : 9112228772 / 9822829555
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा २५ जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment