अमरावतीत परशुराम जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा

अमृत संस्थेतर्फे उत्साहात स्वागत; गोमातेची रक्ततुला या अनोख्या कार्यक्रमाचेही आयोजन

अमरावतीत परशुराम जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा मुख्य फोटो
अमरावतीत परशुराम जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा अतिरिक्त फोटो

अमरावती : भगवान श्री परशुराम जयंतीच्या निमित्ताने अमरावती शहरात काढण्यात आलेल्या भव्य शोभायात्रेचे अमृत संस्थेच्या अमरावती कार्यालयातर्फे उत्साहात स्वागत करण्यात आले. या प्रसंगी विविध मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था ब्राह्मणांसह खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे.

शोभायात्रेत अमृत संस्थेच्या योजनांची माहिती देऊन त्या योजनांचा जास्तीत जास्त जणांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले. शोभायात्रेला अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गोविंद कुलकर्णी, विदर्भ प्रांतप्रमुख पप्पू चांगाणी, शहराध्यक्ष प्रवीण जोशी, तसेच इतर अनेक मान्यवर उपस्थित होते. अमृत संस्थेचे अमरावती जिल्हा व्यवस्थापक केदार गोगरकर यांच्यासह संस्थेचे अन्य कर्मचारीही उपस्थित होते. या वेळी गोमातेची रक्ततुला हा अभिनव उपक्रम राबवण्यात आला. गोवंश संवर्धन या विषयातील जनजागृतीसाठी आयोजित केलेल्या या उपक्रमात गोरक्षकांनी रक्तदान केले.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा २५ जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/


Publisher: Deepak Gogarkar News publisher name | Date: 20-04-2026 News publication date | Time: 12:34 PM News publication time | Views: 655 Number of times this news has been viewed | District: amaravati Related district of the news
Publisher: Deepak Gogarkar News publisher name | Date: 20-04-2026 News publication date | Time: 12:34 PM News publication time | Views: 655 Number of times this news has been viewed | District: amaravati Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement