अमृत आनंद मेळाव्यातून मुलांनी घेतला प्रेरणेचा नवा मंत्र

बुलढाणा जिल्ह्याच्या मेहकर तालुक्यातील नित्यानंद आश्रमात आयोजन

अमृत आनंद मेळाव्यातून मुलांनी घेतला प्रेरणेचा नवा मंत्र मुख्य फोटो
अमृत आनंद मेळाव्यातून मुलांनी घेतला प्रेरणेचा नवा मंत्र अतिरिक्त फोटो

मेहकर (बुलढाणा) : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे लक्ष्यित गटाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. अमृत वर्ग हा त्यातीलच एक महत्त्वाचा उपक्रम आहे. विवेकानंद नगरमधील नित्यानंद आश्रमात अमृत वर्गाचा अमृत आनंद मेळावा मोठ्या उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला. या मेळाव्यात लहान मुलांसाठी विविध बौद्धिक, शारीरिक आणि संस्कार करणाऱ्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमात मुलांना संस्कार, शिक्षण, मन, बुद्धी आणि शरीर यांचा समतोल विकास साधण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. बौद्धिक खेळ, प्रार्थना, योगासने, शारीरिक हालचाली, तसेच प्रेरणादायी सत्रांमुळे मुलांना एक सकारात्मक आणि प्रेरणादायी अनुभव मिळाला.

या वेळी अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक जिग्नेश कमानी यांनी सांगितले, की 'आजच्या स्पर्धात्मक युगात मुलांचा सर्वांगीण विकास होणे अत्यंत आवश्यक आहे. संस्कार, शिक्षण आणि मन, बुद्धी, शरीर यांचा समतोल राखला तरच मुलांचे भविष्य उज्ज्वल होऊ शकते.'

त्यानंतर जिल्हा उपव्यवस्थापक नंदकिशोर नगर यांनीही आपल्या मनोगतातून या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या संस्थाचालकांनी या उपक्रमाचे कौतुक करून भविष्यात अशा उपक्रमांचे अधिक व्यापक स्वरूपात आयोजन करण्याची अपेक्षा व्यक्त केली.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा २५ जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/


Publisher: Jignesh Kamani News publisher name | Date: 20-04-2026 News publication date | Time: 08:59 AM News publication time | Views: 439 Number of times this news has been viewed | District: Buldhana Related district of the news
Publisher: Jignesh Kamani News publisher name | Date: 20-04-2026 News publication date | Time: 08:59 AM News publication time | Views: 439 Number of times this news has been viewed | District: Buldhana Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement