बुलढाण्यात अमृतपेठ थेट बाजारपेठेला उत्तम प्रतिसाद

आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते झाले उद्घाटन

बुलढाण्यात अमृतपेठ थेट बाजारपेठेला उत्तम प्रतिसाद मुख्य फोटो
बुलढाण्यात अमृतपेठ थेट बाजारपेठेला उत्तम प्रतिसाद अतिरिक्त फोटो

बुलढाणा : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे बुलढाणा शहरात अमृतपेठ थेट बाजारपेठ आयोजित करण्यात आली होती. या बाजारपेठेला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन झाले. नगराध्यक्षा सौ. पूजा गायकवाड, तसेच विभाग संघचालक चित्तरंजन राठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

उद्घाटनानंतर मान्यवरांनी विविध स्टॉल्सना भेट देऊन स्थानिक उद्योजक, महिला बचत गट, कारागीर व उत्पादक यांच्याशी संवाद साधला आणि त्यांच्या उपक्रमांचे कौतुक केले. या प्रदर्शनात हस्तकला, पारंपरिक खाद्यपदार्थ, घरगुती उत्पादने व विविध उपयुक्त वस्तूंचे आकर्षक स्टॉल्स उभारण्यात आले होते. नागरिकांनी मोठ्या उत्साहाने खरेदी करून स्थानिक उत्पादकांना प्रोत्साहन दिले. अमृतपेठेच्या माध्यमातून स्थानिक उत्पादकांना बाजारपेठ उपलब्ध होऊन स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करण्यास मदत मिळत आहे.

'अशा उपक्रमांमुळे महिला सक्षमीकरण, लघुउद्योग विकास आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना हे उद्देश साध्य होतात. नागरिकांनी स्थानिक उत्पादनांना प्राधान्य देऊन अशा उपक्रमांना सहकार्य करावे,' असे आवाहन मान्यवरांनी केले.

या वेळी नगर परिषद उपाध्यक्ष गजेंद्र दांदडे, शिवसेना शहरप्रमुख आशिष जाधव, अॅड. कवीमंडन, पंकज अग्रवाल, इंदरचंद कोटेचा, अमृत संस्थेचे विभागीय व्यवस्थापक प्रवीण कोळेश्वर, अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक जिग्नेश कमानी यांच्यासह अनेक मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा २५ जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/


Publisher: Jignesh Kamani News publisher name | Date: 19-04-2026 News publication date | Time: 08:58 PM News publication time | Views: 694 Number of times this news has been viewed | District: Buldhana Related district of the news
Publisher: Jignesh Kamani News publisher name | Date: 19-04-2026 News publication date | Time: 08:58 PM News publication time | Views: 694 Number of times this news has been viewed | District: Buldhana Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement