अहिल्यानगर जिल्हा कार्यालयात प्रतिमापूजन
अहिल्यानगर : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या अहिल्यानगर जिल्हा कार्यालयात वैशाख शुद्ध तृतीया अर्थात अक्षय्य तृतीयेदिनी भगवान परशुराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. भगवान परशुरामांचे प्रतिमापूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. अमृत संस्थेचे अहिल्यानगर जिल्हा व्यवस्थापक सागर भोपे, अमृतमित्र वैभव कुलकर्णी व अमृतमित्र सुजल झुंजारे यांनी त्यांना अभिवादन केले.
'शौर्य, पराक्रम, धर्मरक्षण आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा देणारे भगवान परशुराम हे भारतीय संस्कृतीतील तेजस्वी आदर्श आहेत. भगवान परशुरामांच्या दैवी कृपेने सर्वांचे मार्ग बुद्धिमत्तेने आणि शक्तीने उजळून निघावेत,' अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या आहेत.
अधिक माहितीसाठी संपर्क : 9112228769
जिल्हा कार्यालय : वरुण अपार्टमेंट, आकाशवाणीसमोर,
प्रोफेसर चौक, सावेडी, अहिल्यानगर - 414003
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा २५ जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment