नागपूर : खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्यरत असलेल्या अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या विभागीय कार्यालयात नागपूर शहरातील उद्योजकांसोबत विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले.
नागपूर : खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्यरत असलेल्या अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या विभागीय कार्यालयात नागपूर शहरातील उद्योजकांसोबत विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. या सत्रामध्ये उद्योजकांना अमृत संस्थेच्या विविध योजना, उद्योजकता विकास, तसेच प्रशिक्षणाच्या विविध संधींबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमाला नागपूरचे विभागीय व्यवस्थापक देवदत्त पंडित, नागपूरचे जिल्हा व्यवस्थापक हर्षल गद्रे, जिल्हा उपव्यवस्थापक सौ. वृषाली सवनकर, विभागीय उपव्यवस्थापक ओंकार गांधी, जिल्हा उपव्यवस्थापक प्रतीक आकरे, अमृतसखी दर्शना जाब्रस, अमृतसखी सौ. नितू वसाडकर आदी उपस्थित होते. महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र अर्थात एमसीईडीचे राज्य समन्वयक श्रीकांत कुलकर्णीदेखील या वेळी उपस्थित होते. श्रीकांत कुलकर्णी यांनी सर्व संपर्कित उद्योजकांशी प्रत्यक्ष संवाद साधून या कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन केले. या वेळी त्यांनी एमसीईडी संस्थेअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या विविध योजना, उद्योजकता विकास प्रशिक्षण (EDP), तसेच उद्योजकांसाठी उपलब्ध साह्य व सुविधांची सविस्तर माहिती दिली.
जिल्हा व्यवस्थापक हर्षल गद्रे यांनी अमृत संस्थेबद्दल माहिती देऊन, योजनांचे उद्दिष्ट, लाभार्थी निवड प्रक्रिया व उद्योजकांना मिळणाऱ्या साह्याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संदीप पाथे यांनी मोलाचे सहकार्य केले. या चर्चासत्रातून उद्योजकांच्या विविध शंका दूर झाल्या असून, अमृत व एमसीईडीच्या माध्यमातून उद्योग उभारणीला प्रोत्साहन मिळत असल्याची भावना उपस्थित उद्योजकांनी व्यक्त केली.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment