अहिल्यानगर जिल्ह्यातील लाभार्थ्यांनी अमृत संस्थेच्या मुख्यालयात भेट देऊन मानले आभार
अहिल्यानगर : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. उद्योजकांना साह्य म्हणून वैयक्तिक कर्ज व्याजपरतावा योजना राबवली जाते. अहिल्यानगरच्या श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील वैभव विवेकानंद फडणवीस आणि विवेकानंद फडणवीस यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. त्यांनी अमृत संस्थेच्या पुणे येथील मुख्यालयात जाऊन अमृत संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांची भेट घेऊन आभार मानले. सुमेधा देशपांडे यांचीही त्यांनी भेट घेऊन आभार मानले.
वैभव विवेकानंद फडणवीस शेती व्यवसाय करतात. 'आज मी यशस्वी व्यावसायिक असून, अमृत संस्थेच्या वैयक्तिक कर्ज व्याजपरतावा योजनेमुळे मला योग्य वेळी आर्थिक साह्य मिळाले. त्यामुळे आमच्या वाटचालीला मोठा हातभार लागला,' अशा शब्दांमध्ये फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
अधिक माहितीसाठी संपर्क : 9112228769
जिल्हा कार्यालय : वरुण अपार्टमेंट, आकाशवाणीसमोर,
प्रोफेसर चौक, सावेडी, अहिल्यानगर - 414003
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा २५ जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment