अमृत संस्थेच्या योजनांच्या मौदा तालुक्यातील प्रभावी अंमलबजावणीसाठी नियोजन

अमृत संस्थेचे नागपूर जिल्हा व्यवस्थापक हर्षल गद्रे यांनी मौदा तालुक्याला भेट देऊन आढावा घेऊन नियोजन केले.

फोटो उपलब्ध नाहीत

या बातमीशी संबंधित कोणतेही फोटो उपलब्ध नाहीत

नागपूर : खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्यरत असलेल्या अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेचे नागपूर जिल्हा व्यवस्थापक हर्षल गद्रे यांनी नागपूरच्या मौदा तालुक्याला भेट देऊन आढावा घेतला. या वेळी मौदा तालुकाध्यक्ष मुकेश अग्रवाल यांच्याशी त्यांनी सविस्तर चर्चा केली.

या भेटीमध्ये जिल्हा व्यवस्थापक गद्रे यांनी अमृत संस्थेची उद्दिष्टे, लाभ व अंमलबजावणी प्रक्रिया याबाबत सविस्तर माहिती दिली. तालुक्यातील नवीन लाभार्थ्यांपर्यंत विविध योजना प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी अग्रवाल यांच्या माध्यमातून लाभार्थी भेटींचे नियोजन करण्यात आले. मौदा तालुक्यातील विविध लक्ष्यित गटांमधील संभाव्य लाभार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन संवाद साधण्याचे नियोजन जिल्हा व्यवस्थापकांनी या वेळी केले. लाभार्थ्यांच्या गरजा, अडचणी व अपेक्षा जाणून घेऊन त्यानुसार अमृत संस्थेच्या योजनांची अंमलबजावणी अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात आला. या उपक्रमामुळे अमृत संस्थेच्या योजनांचा लाभ अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यास मदत होणार असून, तालुकास्तरावर योजनेची प्रभावी अंमलबजावणी होईल, असा विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला.

अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.

अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/

Publisher: Harshal Gadre News publisher name | Date: 19-12-2025 News publication date | Time: 12:00 AM News publication time | Views: 59 Number of times this news has been viewed | District: nagpur Related district of the news
Publisher: Harshal Gadre News publisher name | Date: 19-12-2025 News publication date | Time: 12:00 AM News publication time | Views: 59 Number of times this news has been viewed | District: nagpur Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words