अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन प्रारंभ
ठाणे : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे अमृत परिवार सर्वेक्षण अभियान राबवले जात आहे. ठाणे जिल्ह्यातही त्याची सुरुवात झाली आहे. अमृत संस्थेच्या ठाणे जिल्हा उपव्यवस्थापक माया रत्नपारखी-खेत्रे यांनी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन या अभियानाचा प्रारंभ केला.
या वेळी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे शशांक खेर, शैलजा वैद्य, दीपक भिडे, अनिल सरदेसाई, विवेक भोळे, सुबोध पाटील हे पदाधिकारी उपस्थित होते. खुल्या प्रवर्गातील ब्राह्मणांसह अनेक जातींसाठी कार्यरत असलेल्या अमृत संस्थेच्या कार्याला निरपेक्ष भावनेने सर्वतोपरी सहकार्य करण्याची अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाची भूमिका आहे. ब्राह्मण जातींमधील पात्र उमेदवारांना अमृत संस्थेच्या वैयक्तिक कर्ज व्याजपरतावा योजनेसह सर्व योजनांचा लाभ मिळावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कर्जव्याजपरतावा योजनेमध्ये दोन वर्षांचा व्याजपरतावा अमृत संस्थेकडून दिला जातो, त्याचा कालावधी संपूर्ण कर्जकालावधीपर्यंत असावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क :
माया रत्नपारखी-खेत्रे - 91122 26533
ठाणे जिल्हा उपव्यवस्थापक, अमृत
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा २५ जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment