खेळ आणि उपक्रमांच्या माध्यमातून निर्णयक्षमता व नेतृत्वगुणांचे धडे

नागपुरात अमृत संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या अचीव्हमेंट मोटिव्हेशनल ट्रेनिंग कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद

फोटो उपलब्ध नाहीत

या बातमीशी संबंधित कोणतेही फोटो उपलब्ध नाहीत

नागपूर : अमृत संस्थेच्या नागपूर जिल्हा कार्यालयात दोन दिवसांचा अचीव्हमेंट मोटिव्हेशनल ट्रेनिंग (एएमटी) कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे निवृत्त प्रादेशिक अधिकारी डॉ. अभिराम डबीर यांनी लाभार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी डॉ. डबीर यांनी विविध नावीन्यपूर्ण खेळ व उपक्रमांच्या माध्यमातून लाभार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्यावर भर दिला. या उपक्रमांतून सकारात्मक विचार, टीमवर्क, निर्णयक्षमता व नेतृत्वगुण विकसित करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. लाभार्थ्यांनी या प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यशप्राप्तीसाठी आवश्यक असलेली सकारात्मक मानसिकता, स्वप्रेरणा, उद्दिष्ट निर्धारण व कौशल्यविकास यांबद्दलही डॉ. डबीर यांनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी नागपूर विभागीय व्यवस्थापक देवदत्त पंडित यांच्या उपस्थितीत लाभार्थ्यांशी संवाद साधण्यात आला. या वेळी लाभार्थ्यांनी प्रशिक्षणामध्ये मिळालेल्या अनुभवांबाबत समाधान व्यक्त केले. या संवादानंतर एएमटी कार्यक्रमाचा औपचारिक समारोप करण्यात आला.

प्रशिक्षणामुळे वैयक्तिक, तसेच व्यावसायिक प्रगतीसाठी नवीन दिशा मिळाल्याची भावना सहभागी लाभार्थ्यांनी व्यक्त केली. अशा प्रेरणादायी प्रशिक्षण कार्यक्रमांमुळे लाभार्थ्यांमध्ये स्वयंरोजगार, उद्योजकता व कौशल्याधारित विकासाला चालना मिळत असून, भविष्यातही असे उपक्रम राबवण्यात येणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले.

अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.

अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/

Publisher: Harshal Gadre News publisher name | Date: 19-12-2025 News publication date | Time: 12:00 AM News publication time | Views: 57 Number of times this news has been viewed | District: nagpur Related district of the news
Publisher: Harshal Gadre News publisher name | Date: 19-12-2025 News publication date | Time: 12:00 AM News publication time | Views: 57 Number of times this news has been viewed | District: nagpur Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words