'अमृत संस्था म्हणजे बेरोजगार व्यक्तींना ऊर्जा आणि नवी दिशा देणारे केंद्र'

लातूरमधील कौशल्य विकास उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त निशांत सूर्यवंशी यांनी केली प्रशंसा

'अमृत संस्था म्हणजे बेरोजगार व्यक्तींना ऊर्जा आणि नवी दिशा देणारे केंद्र' मुख्य फोटो
मुख्य फोटो

लातूर : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे अमृत परिवार सर्वेक्षण अभियान सुरू करण्यात आले आहे. त्या अभियानाविषयी चर्चा करण्यासाठी आणि संस्थेच्या योजनांची माहिती देण्यासाठी अमृत संस्थेचे लातूर जिल्हा व्यवस्थापक शुभम मुळजकर यांनी कौशल्य विकास उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त निशांत सूर्यवंशी यांची भेट घेतली. 'अमृत संस्था खूप चांगला उपक्रम राबवत असून, बेरोजगार व्यक्तींसाठी ही संस्था ऊर्जा आणि नवी दिशा देणारे केंद्र आहे,' असे निशांत सूर्यवंशी यांनी सांगितले. या वेळी अमृतसखी कमलाक्षी कुलकर्णीदेखील उपस्थित होत्या.

अधिक माहितीसाठी संपर्क :

शुभम मुळजकर - 7391065470

लातूर जिल्हा व्यवस्थापक, अमृत

पत्ता : अमृत संस्थेचे लातूर जिल्हा कार्यालय,

पहिला मजला, पितृछाया बिल्डिंग, मयुरेश्वर अपार्टमेंट,

सिग्नल कॅम्प, विद्यानगर, ता. जि. लातूर - 413512

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा २५ जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/



Publisher: शुभम सुहासराव मुळजकर News publisher name | Date: 09-04-2026 News publication date | Time: 07:12 PM News publication time | Views: 685 Number of times this news has been viewed | District: Latur Related district of the news
Publisher: शुभम सुहासराव मुळजकर News publisher name | Date: 09-04-2026 News publication date | Time: 07:12 PM News publication time | Views: 685 Number of times this news has been viewed | District: Latur Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement