अहिल्यानगर जिल्ह्यात अमृत परिवार सर्वेक्षणाला प्रारंभ - अमृत महाराष्ट्र

अहिल्यानगर जिल्ह्यात अमृत परिवार सर्वेक्षणाला प्रारंभ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक सुरेश जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली सुरुवात

अहिल्यानगर जिल्ह्यात अमृत परिवार सर्वेक्षणाला प्रारंभ मुख्य फोटो
अहिल्यानगर जिल्ह्यात अमृत परिवार सर्वेक्षणाला प्रारंभ अतिरिक्त फोटो

अहिल्यानगर : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या अहिल्यानगर जिल्हा कार्यालयात आठ एप्रिलला अमृत परिवार सर्वेक्षण अभियानाची सुरुवात करण्यात आली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक सुरेश तथा नाना जाधव यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. या वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अहिल्यानगर दक्षिण जिल्हा संघचालक वाल्मिकराव कुलकर्णी आणि अहिल्यानगर दक्षिण जिल्हा कार्यवाह हिराकांत रामदासी हेही उपस्थित होते.

सुरुवातीला भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर अमृत संस्थेच्या सर्व योजना आणि उपक्रमांची सविस्तर माहिती त्यांना देण्यात आली. अमृत संस्थेतर्फे त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. वाल्मिकराव कुलकर्णी यांची नोंदणी करून अमृत परिवार सर्वेक्षणाची सुरुवात करण्यात आली. नाना जाधव यांच्या हस्तेही सर्वेक्षण फॉर्म भरण्यात आला.

या वेळी अमृत संस्थेचे राज्य व्यवस्थापक दीपक जोशी, नाशिक विभागीय व्यवस्थापक मंगेश खाडिलकर, जिल्हा व्यवस्थापक सागर भोपे, अमृतमित्र वैभव कुलकर्णी व अमृतसखी गौरी कुलकर्णी आदी उपस्थित होते.

अधिक माहितीसाठी संपर्क : 9112228769

जिल्हा कार्यालय : वरुण अपार्टमेंट, आकाशवाणीसमोर, 

प्रोफेसर चौक, सावेडी, अहिल्यानगर - 414003

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा २५ जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/


Publisher: Sagar Bhope News publisher name | Date: 09-04-2026 News publication date | Time: 03:27 PM News publication time | Views: 1,657 Number of times this news has been viewed | District: Ahilyanagar Related district of the news
Publisher: Sagar Bhope News publisher name | Date: 09-04-2026 News publication date | Time: 03:27 PM News publication time | Views: 1,657 Number of times this news has been viewed | District: Ahilyanagar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement