लघुउद्योजकांसाठी सुवर्णसंधी; लवकरात लवकर संपर्क साधण्याचे आवाहन
गडचिरोली : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिक दृष्ट्यादुर्बल घटकांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. त्यासाठी वेगवेगळ्या योजना आणि वेगवेगळे उपक्रम राबवले जात असतात. उद्योजकतावाढीसाठी आणि लघुउद्योजकांना विक्रीकरिता व्यासपीठ मिळण्याकरिता अमृतपेठ थेट बाजारपेठ हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबवला जातो. विदर्भासह राज्याच्या सर्व विभागांमध्ये यशस्वी ठरलेला हा उपक्रम लवकरच गडचिरोली जिल्ह्यातही राबवला जाणार असून, लघुउद्योजकांनी लवकरात लवकर अमृत संस्थेच्या जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
अमृतपेठ थेट बाजारपेठ या उपक्रमाचा हेतू अमृत संस्थेच्या लक्ष्यित गटातील नवउद्योजक व लघुउद्योजक यांना आधार देणे आणि त्यांना ग्राहक मिळवून देऊन त्यांच्या व्यवसायवाढीला साह्य करणे हा आहे. यामध्ये वेगवेगळे लघुउद्योजक स्टॉल लावतात आणि आपल्या प्रॉडक्टची विक्री करतात. ग्राहकांना थेट उत्पादकांकडून दर्जेदार स्थानिक उत्पादने खरेदी करता येतात आणि उद्योजकांना दलालाशिवाय बाजारपेठ मिळते, हे या उपक्रमाचे वेगळेपण आहे.
नागपूर विभागातही अनेक जिल्ह्यांमध्ये हा उपक्रम झाला असून, गडचिरोली जिल्ह्यामध्येही लवकरच त्याचे आयोजन केले जाणार आहे. त्यामुळे लघुउद्योजकांनी लवकरात लवकर अमृत संस्थेच्या जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ग्राहकांनीही येथे खरेदी करून उद्योजकांना साह्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क : 91122 26527
पत्ता : अमृत संस्थेचे गडचिरोली जिल्हा कार्यालय, गांधी चौक, चामोर्शी रोड,
पोस्ट ऑफिसच्या बाजूला, आयसीआयसीआय बँकेसमोर,
न्यू लाइफ हॉस्पिटलच्या वर, गडचिरोली.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा २५ जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment